Gadchiroli Teacher Rashtriya Award : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील एटापल्ली (Etapalli) तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंथय्या बेडके (Mantaiah Bedke) यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील दुर्गम भागात सातत्यपूर्ण आणि डिजिटल अध्यापनाच्या कामाचा गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये कोल्हापूर येथील सागर बगाडे व गडचिरोली जिल्ह्यातील मंथय्या बेडके यांचा समावेश आहे.


5 सप्टेबर रोजी दिल्लीत होणार सन्मान


5 सप्टेबर रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात बेडके यांना रजत पदक, स्मृतीचिन्ह व 50 हजार रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. बेडके यांनी जाजावंडी येथील शाळेचा कायापालट करत बंद होणाऱ्या शाळेत 7 विद्यार्थ्यांपासून 137 पटसंख्येवर मजल मारली आहे. चौथीपर्यंत असलेली शाळा त्यांच्या प्रयत्नाने 7 वी पर्यंत नेली आहे. अनंत अडचणीनंतर त्यांनी शाळेचे डिजिटल रूप कायम राखल्याचा हा राष्ट्रीय गौरव समजला जात आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याने ऊर्जा मिळाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


महत्वाच्या बातम्या:


Gulmohar Movie : राष्ट्रीय पुरस्कारावर 'गुलमोहर'ची मोहोर; शर्मिला टागोर, अमोल पालेकर यांच्या मुख्य भूमिका 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI