आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीला खासदार शिवाजी आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, आमदार नीलम गोऱ्हे यांच्यासह शिवसेनेचे संपर्क प्रमुख उपस्थित होते.
पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड येथील युतीबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. पण तेथील स्थानिक आमदार आणि खासदारांनी युतीविरोधात आपलं मत मांडलं. भाजपमध्ये बाहेरुन लोकं घेतली जात आहेत. त्यामुळे या लोकांसाठी युतीच्या चर्चेत भाजप जागांबाबत अवास्तव मागणी करत आहेत. याचा फटका शिवसेनेलाही बसू शकतो. असं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सगळ्या जागांची यादीही उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
भाजप युतीच्या प्रतीक्षेत
शिवसेनेने मुंबई महापालिकेसाठी कॅम्पेनिंग सुरु केले असताना भाजपमध्ये काहीही हालचाली दिसत नाहीत. शिवसेनेसोबत युती होईल, या प्रतीक्षेत भाजप आहे. म्हणूनच भाजपचा जाहीरनामाही रखडला आहे.
शिवसेनेची तयारी
शिवसेनेने मुंबई महापालिकेसाठी ‘वचननामा’ प्रसिद्ध करत भाजपच्या पुढे एक पाऊल टाकले आहे. एवढंच नव्हे, तर मुंबईतल 227 जागांसाठी उमेदवार यादीही अंतिम करण्यात आली आहे. शिवाय, 26 तारखेला उद्धव ठाकरेंची सभाही होणार आहे.
भाजपची तयारी कुठवर?
भाजपने मुंबई महापालिकेसाठी अद्याप 227 उमेदवारांची यादीही अंतिम केली नाही. मात्र, काल रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची दोन तासांहून आधिक वेळ भेट झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यात आहे.
संबंधित बातम्या:
शिवसेनेची तयारी जोरात, भाजपची फरफट सुरुच