सांगली: बैलगाडी शर्यत चालू करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पवनचक्कीच्या टॉवरवर चढून एका शेतकऱ्याचे आंदोलन केलं.

पेटा हटवा, कायदा बदला, बैलगाडी शर्यत चालू करा असा फलक गळ्यात घालून, या शेतकऱ्यांने हे आंदोलन सुरु केलं.



या आंदोलनाची माहिती मिळताच, अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अचानक सुरु झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची मात्र तारांबळ उडाली.

बैलगाडी शर्यतीसाठी शिवसेनेचा आवाज

तामिळनाडूत जशी जलीकट्टूला परवानगी मिळाली, तशीच महाराष्ट्रात बैलगाडीच्या शर्यतींना मिळावी अशी भूमिका, शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली आहे.

त्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती खासदार पाटील यांनी दिली.

संबंधित बातमी
बैलगाडी शर्यतीसाठी शिवसेनेचा आवाज