Nashik Eknath Shinde : नाशिक (Nashik) जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील महिनाभरात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली शेतकरार्थी संकटात सापडला आहे. अशातच अयोध्या दौऱ्यावरून आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) थेट शेतकऱ्यांच्या बांधावर नाशिक तालुक्यात पाहणी दौऱ्यासाठी येत आहेत. 


नाशिकसह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्याला (Nashik District) अवकाळी पावसाने रविवारी अक्षरशः झोडपून काढले आहे. नाशिक तालुक्यासह जिल्ह्यातील सटाणा (Satana), देवळा, नांदगाव, सिन्नर आदी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. वादळी वाऱ्यासह गारांच्या वर्षांवासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, भाजीपाला आणि पिकांना फटका बसला आहे. अशातच अनेक भागात शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिक अनेक भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय अयोध्या (Ayodhya Tour) दौऱ्यावर होते. अशातच काल राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिकसह जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने विद्युत पुरवठा बंद झाला तर झाडे रस्त्यावर आडवी पडल्याने वाहतूक देखील बंद झाल्याचे पाहायला मिळाले. 


शेतीपिकांचे नुकसान 


नाशिक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारांच्या वर्षवास झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, भाजीपाला आणि पिकांना फटका बसला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शहरातील बाजारपेठेत एकच धांदल उडाली. शेतात काढणी बरोबर आलेल्या गावाबरोबर हरभरा कांदा तसेच भाजीपाल्याचे इतर पिकांना देखील गारांसह कोसळत असलेल्या पावसाच्या तडाख्याने हातात आलेला शेतमाल वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नांदगाव तालुक्यात अगोदर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अगोदर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. 


मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर 


दरम्यान दोन दिवस अयोध्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे जिल्ह्यातील अनेक भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यात जिल्ह्यातील चांदवड, देवळा, बागलाण सटाणा शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे. या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी दौरा करणार असल्याचे समजते. त्यामुळे अयोध्या दौऱ्यानंतर शिंदे लागलीच शेतकऱ्यांच्या बांधावर येत असून शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण महिनाभरात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.