Nashik Farmers crop insurance News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 5 हजार 172 शेतकऱ्यांचा बोगस पिक विमा (Bogus crop insurance) असल्याची माहिती समोर आली आहे. कृषी विभागानं (Department of Agriculture) केलेल्या पडताळीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्य शासनाच्या एक रुपयात पिक विमा योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांनी (Farmers) कांदा पीक होत नसलेल्या ठिकाणी देखील कांदा (Onion) लागवड दाखवत खोटा विमा उतरवला आहे. यंदाच्या खरिपात 3 कोटी 96 लाखांचा बोगस पिकविमा उतरवल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे.


एन.ए प्लॉटवर देखील कांदा लागवड दाखवली


नाशिकच्या कृषी विभागाच्या पडताळणीतून धक्कादायक बाब समोर आली आहे. एन.ए प्लॉटवर देखील कांदा लागवड दाखवण्यात आल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड, देवळा, बागलाण, कळवण, मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. याबाबात सीएससी सेंटर चालकांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी दिली आहे. शेतकऱ्यांचे स्वयंघोषणापत्र आणि पडताळणी करुन पिक विमा उतरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा ही योजना लागू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. मात्र नाशिक जिल्ह्यातील जवळपास 5 हजार शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात 3 कोटी 96 लाखांचा बोगस पिक विमा उतरवण्याची धक्कादायक माहिती कृषी विभागाच्या पडताळणीतून समोर आली आहे. या शेतकऱ्यांमध्ये 3670 कांदा उत्पादक तर 505 डाळिंब, द्राक्ष, सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत अशी माहिती नाशिक विभागाचे कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांनी दिली आहे. 


प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचा पीक विमा उतरवला जातो. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं शेतकऱ्यांना जे योगदान द्यावं लागायचं ते भरण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा भरता आला. अनेक शेतकऱ्यांना योजनेचा फायदा झाला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला अनेक शेतकऱ्यांना बोगस वीक विमा उतरवल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा उतरवला आहे, त्या शेतकऱ्यांवर कारवलाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर