राजापूर : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार? याबाबत काथ्याकूट सुरु असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट प्रचाराला सुरुवात केली आहे. आज राजापूरमध्ये बोलताना त्यांनी थेट उमेदवारीचे संकेत देताना निवडून आल्यानंतर खासदार कसा असतो दाखवून देणार असल्याचे राणे म्हणाले. 


रत्नागिरी लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा उमेदवार निवडून येईल


त्यामुळे नारायण राणे हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार का? याची चर्चा रंगली आहे. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, भाजपने उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढवणार लढवणार असून खासदार कसा असतो हे दाखवणार आहे. ते म्हणाले की रत्नागिरी लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा उमेदवार निवडून येईल. मी गेल्या 34 वर्षांपासून लोकप्रतिनिधी आहे. चार विधानसभा मतदारसंघांनी मला लीड दिले तर मी जिंकलोच म्हणून समजा असेही राणे यावेळी म्हणाले. 


म्हणून तुम्ही गुपचुप मोदींना जाऊन भेटला


यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की उद्धव ठाकरे शिवसेना उभी करताना कुठेही नव्हता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एका तरी शिवसेनेच्या घरी गेले का? अशी विचारणा केली. उद्धव ठाकरे यांची मदत करणे प्रवृत्ती नाही फक्त जमा करणे हा त्यांचा एक वनवे कार्यक्रम असल्याची टीका त्यांनी केली. मुलाला अटक होऊ नये म्हणून तुम्ही गुपचुप मोदींना जाऊन भेटला. चार जूननंतर तुम्ही जेलमध्ये जाता की तडीपार होता ते पाहू असेही ते म्हणाले. उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर काय केलं, तर शिवसेना संपवून दाखवली, अशी टीका त्यांनी केली. 


विनायक राऊत यांच्या राजीनामा जाहीरनाम्याची चिरफाड करणार 


ते पुढे म्हणाले की कोकणात रोजगार का आला नाही? स्वतःच्या नावावर टोल घेऊ शकतो असा हा खासदार असल्याची टीका विनायक राऊत त्यांच्यावर केली. प्रत्येक विकासाच नाव आले की खासदारांनी विरोध केल्याचे ते म्हणाले. मी तीन लाख कोटींचा रिफायनरी प्रकल्प आला होता, असे त्यांनी सांगितले. शर्टवर जॅकेट घालायला लागला म्हणजे विभागाचा विकास होत नाही, असे ते यावेळी म्हणाले. विनायक राऊत यांच्या राजीनामा जाहीरनाम्याची चिरफाड करणार असल्याचेही राणे म्हणाले. माझ्याबद्दल खोट सांगण्याचं काम मतदारसंघांमध्ये होत असल्याचा राणे म्हणाले. नाव विनायक मात्र काम कशी बघा, अशी टीका त्यांनी केली. विनायक राऊत यांना घरी बसवायचं असल्याचे त्यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या