Babanrao Gholap : लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Election 2024) शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) आज शिंदे गटात (Shivsena Shine Faction) प्रवेश करण्याची शक्यता आहे. संध्याकाळी चार वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बबनराव घोलप प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. 


गेल्या काही दिवसांपासून बबनराव घोलप ठाकरे गटात नाराज होते. शिर्डीच्या (Shirdi Lok Sabha Constituency) उमेदवारी न मिळाल्याने बबनराव घोलप नाराज असल्याचे बोलले जात होते. ते आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप (Yogesh Gholap) यांची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. घोलप यांच्यासोबत आणखी काही पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता आहे. 


राजीनामा देऊन दोन महिने उलटले तरी कुणीही संपर्क साधला नाही 


बबनराव घोलप यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की,  माझ्यावर अन्याय झाला आहे. याबाबत मी संजय राऊत (Sanjay Raut) यांना सांगितले होते. ते म्हणाले मी वकिली करेल पण त्यांनी माझे म्हणणे मांडले नाही. मी राजीनामा देऊन दोन महिने झाले आहेत. तेव्हापासून मला कोणीही संपर्क साधला नाही. म्हणून मी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षात जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


बबनराव घोलपांचा मिलिंद नार्वेकरांवर हल्लाबोल


मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) कोण आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे. तो एक शिपाई माणूस आहे. त्यांचे ऐकून घेतले जात आहे. आम्ही 50 वर्ष कामे केली. मात्र आमचे ऐकून घेतले जात नाही. पक्ष फुटतो तरीदेखील त्यांचेच ऐकतात. त्यांना एवढे महत्व का देत आहेत. मला संपर्कप्रमुख पदावरून का काढले? याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही, असा हल्लाबोल करत बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) जय महाराष्ट्र केला आहे. बबनराव घोलपांचा राजीनामा हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nashik Loksabha : 'नाशिकमधून भुजबळ नव्हे तर हेमंत गोडसेच निवडणूक लढणार', शिवसेनेच्या दाव्याने महायुतीत पेच वाढणार!


नाशिकच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असतानाच उद्या राष्ट्रवादी उमेदवाराची घोषणा करणार? छगन भुजबळांचं तिकीट फिक्स?