मुंबई : काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर नारायण राणे यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असं राणेंच्या नव्या पक्षाचं नाव असेल. मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पक्षाची घोषणा केली आहे. लवकरच या पक्षाची नोंदणी करणार असल्याचं राणेंनी सांगितलं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्गमधील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. तसंच राणेंच्या भाजप प्रवेशाच्याही चर्चा सुरु होत्या. अमित शाहांची भेटही राणेंनी दिल्लीत जाऊन घेतली होती.
मात्र नुकत्याच आपल्या मुंबई दौऱ्यात अमित शाहांनी राणेंना नवा पक्ष काढण्यास सांगितल्यांची माहिती आहे. त्यामुळे राणेंनी नवीन पक्ष स्थापन केला आहे.
उद्धव ठाकरेंवर राणेंचा हल्लाबोल
आपल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे पंतप्रधानांवर टीका करतात, मात्र त्यांचं राज्यासाठी-देशासाठी योगदान काय असा खडा सवालच राणेंनी विचारला आहे. शिवसेना सत्तेतून कधीच बाहेर पडणार नाही, शिवसेनेला जर हाकललं तरच शिवसेना सत्तेतून जाईल असं म्हणत राणेंनी शिनसेनेवर निशाणा साधला.
नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी कर्जमाफी याबाबतीत कधी शिवसेना मंत्र्यांनी काही सूचना दिली का?, महागाई कमी करण्यासाठी शिवसेनेने काही सल्ला सुचवला का? मुंबईत कर वाढवल्याने मराठी माणूस घर घेऊ शकत नाही, त्याबद्दल उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? असे अनेक सवाल त्यांनी शिवसेनेवर उपस्थित केले.
उद्धव ठाकरे केवळ टीका करण्याचं काम करतात, त्यांना चांगलं काही दिसत नाही. मुंबईतील मराठी माणूस हद्दपार होण्याला शिवसेनाच जबाबदार असल्याचा घणाघात नारायण राणेंनी केला.
एनडीएमध्ये जाणार का?
नारायण राणेंना एनडीएतील सहभागाबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी राणेंनी एनडीएसोबत जाणार का यावर उघडपणे बोलणं टाळलं. एकदा पक्ष स्थापन होऊ द्या, मग एनडीएकडून बोलावणं आल्यास आम्ही एनडीएत जाऊ असं राणेंनी स्पष्ट केलं.
'हे' दोघे सोडून सर्वच मित्र
काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेतील सर्वच जण आपले मित्र आहेत, मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोडून इतर सर्व मित्र असल्याचं राणे म्हणाले.
नितेश राणे नव्या पक्षात कधी?
नितेश राणे सध्या काँग्रेस आमदार आहेत, ते राणेंच्या नव्या पक्षात कधी दाखल होतील यावर उघडपणे बोलणं, नारायण राणेंनी टाळलं. नितेश राणे यांनी साहेब देतील तो आदेश मान्य असेल असं नुकतंच म्हटलं होतं.
नारायण राणेंच्या भाषणातील मुद्दे :
शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, हाकलवलं तरच शिवसेना बाहेर पडणार : नारायण राणे
उद्धव ठाकरेंचं देशासाठी, राज्यासाठी योगदान काय? ते थेट पंतप्रधानांवर टीका करतात : नारायण राणे
उद्धव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख, त्यांचं देशासाठी-राज्यासाठी योगदान काय, याच आत्मपरीक्षण त्यांनी केलेलं नाही : नारायण राणे
नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी कर्जमाफी याबाबतीत कधी शिवसेना मंत्र्यांनी काही सूचना दिली का? : नारायण राणे
महागाई कमी करण्यासाठी शिवसेनेने काही सल्ला सुचवला का? : नारायण राणे
मुंबईत कर वाढवल्याने मराठी माणूस घर घेऊ शकत नाही, त्याबद्दल उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? : नारायण राणे
काल भाषण सुरु असतानाच शिवसैनिक जात होते, त्यांना भाषण पटत नव्हतं : नारायण राणे
उद्धव ठाकरे फक्त टीका करण्याचं काम करतात, त्यांना चांगलं काही दिसत नाही : नारायण राणे
मुंबईतील मराठी माणूस हद्दपार करण्याला शिवसेना जबाबदार : नारायण राणे
नवीन पक्ष काढण्याचा निर्णय, पक्षाचं नाव ' महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' : नारायण राणे
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची लवकरच नोंदणी करणार : नारायण राणे
काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण सोडून, शिवसेनेत उद्धव ठाकरे सोडून सर्व जण मित्र : नारायण राणे
'महाराष्ट्र स्वाभिमान' नारायण राणेंचा नवा पक्ष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Oct 2017 01:36 PM (IST)
काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर नारायण राणे यांनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असं राणेंच्या नव्या पक्षाचं नाव असेल. मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पक्षाची घोषणा केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -