Nanded news: गावातील ओढ्याला अचानक पूर आला आणि शाळकरी मुलांची मोठी अडचण झाली. पुरात अडकलेल्या या विद्यार्थ्यांना मानवी साखळीच्या मदतीने गावकऱ्यांनी बाहेर काढलंय. नांदेड जिल्ह्यातील (Nanded) अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील ही घटना आहे. 

नांदेड जिल्ह्यात काल संध्याकाळ पासून या मौसमतील पावसाची पहिल्यांदाच चांगली हजेरी लागली आहे. दरम्यान नदी नाल्यांना पूर आला असून नागरिकांची तारांबळ उडत असून काही ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत.

मानवी साखळी करत विद्यार्थ्यांची सुटका

मागील दोन दिवसांपासून नांदेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत अर्धापूर तालुक्यातील खैरगाव गावात ओढ्याला पूर आला. या पुरामुळे शाळेतून घरी येणारी मुले पलीकडच्या बाजूला अडकून पडली. या घटनेची माहिती गावात कळली आणि गावातील गावकरी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सरसावले. मानवी साखळी करत या विद्यार्थ्यांची गावकऱ्यांनी सुखरूप सुटका केली.

शाळेतून घरी परतताना ओढ्याचं पाणी वाढलं..

नांदेड जिल्ह्यातील खैरगाव व रोडगे गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी अर्धापूरला जातात. जिल्ह्यात मंगळवार संध्याकाळपासून झालेल्या पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला होता. मंगळवारी संध्याकाळी शाळा संपल्यावर विद्यार्थी आपल्या घराकडे निघाले होते, पण या रस्त्यात असलेल्या ओढ्याचं पाणी वाढलं आणि विद्यार्थी अडकून पडले. गुडघाभर पाण्यात शाळकरी मुलं अडकल्याची बातमी गावात पसरली आणि गावकरी मदतीसाठी धावले. त्यांनी मानवी साखळी करत विद्यार्थ्यांना सुखरूप सूटका केली.  

पुराच्या पाण्यात प्रवाशांसह रिक्षा गेली वाहून, रिक्षाचा चुराडा, तीन जण बचावले

रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक ओढ्याला आलेल्या पुरात प्रवाशांसह रिक्षा वाहून गेल्याची धक्कादायक घटना (Accident) नांदेडच्या किनवट तालुक्यातील कुपटी येथे घडलीय. यात रिक्षाचा चुराडा झाला असून रिक्षातील तिघेही बचावले आहेत..

कुपटी ते नंदगाव जाणाऱ्या रस्त्यावरील  कुपट्टीच्या पुलावर पुराचे पाणी आले होते. या पाण्यात रिक्षासह तीनही प्रवाशी वाहून गेले. या रिक्षात दोन महिला आणि एक पुरुष असे तीघेजण होते. पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका होता की रिक्षा पुराच्या पाण्यात जवळपास दीड किमी वाहत गेली. या घटनेत वाहून गेलेल्या प्रवाशांचा जीव वाचला आहे.

हेही वाचा:

Nanded News: पुराच्या पाण्यात प्रवाशांसह रिक्षा गेली वाहून, रिक्षाचा चुराडा, तीन जण बचावले

Muharram: श्रद्धेपोटी भाविकांची अग्निपरीक्षा; नांदेडमध्ये मोहरमच्या सवारीत निखाऱ्यावर चालण्याचा प्रकार, 'अंनिस' चा आक्षेप