नांदेड : सध्या सर्वत्र मोहरम (Muharram) सुरू आहे. या मोहरमच्या सवारीत अनेक अंधश्रद्धच्या प्रथा पाळल्या जातात.असाच काहीसा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथे घडला आहे. काल भाविक चक्क इथे निखाऱ्यावरुन चालत होते. अनेक वर्षांपासून हा प्रकार याठिकाणी सुरू आहे.या निखाऱ्यावर नाचताना अनेकांना इजा देखील होत असते.परंतु अंधश्रद्धा च्या नावाखाली हे भाविक इजा झाली तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे आशा अंधश्रद्धा सारख्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत, अशी मागणी अंनिसचे लक्षीमन शिंदे यांनी केलीय.
सरसम येथे सध्या मोहरम निमित्त रात्री गावातून सवारी काढण्यात येत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भाविक वेगवेगळ्या अंधश्रद्धच्या प्रथा पाळतात. रविवारी रात्री सरसम येथील भाविक चक्क निखाऱ्यावर नाचत होते. अनेक वर्षांपासून हा प्रकार याठिकाणी सुरू आहे.या निखाऱ्यावर नाचताना अनेकांना इजा देखील होत असते.परंतु अंधश्रद्धा च्या नावाखाली हे भाविक इजा झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात.दरम्यान 3 सेकंद निखाऱ्यावर पाय ठेवल्यास इजा होत नाही, त्यापेक्षा अधिक काळ पाय ठेवल्यास इजा होते, हे यामागचे शास्त्रीय कारण आहे.या घटनेत अनेक जण जखमी देखील होतात. पण कोणी समोर येत नाही.त्यामुळे अशा अंधश्रद्धा सारख्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत, अशी मागणी अंनिसचे लक्षीमन शिंदे यांनी केलीय.
श्रद्धेच्या अतिरेकातून अंधश्रद्धेचा जन्म
धगधगते गरम निखारे आणि त्यावर चालणारे भाविक हे चित्र डोळ्यासमोर आले तरी अंगावर अक्षरश: काटा येतो. परंतु ही अग्नीपरीक्षा भाविकांकडून दिली जाते. मात्र धगधगत्या निखाऱ्यावर चालणं यात कोणताच चमत्कार नसल्याचं अंधश्रद्धा निर्मुलन क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्ते सांगतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील सीमारेषा ही फार पुसट आहे. श्रद्धेच्या अतिरेकातून अंधश्रद्धेचा जन्म होतोय. पुरोगामी महाराष्ट्रानं आपलं पुरोगामित्व जपताना अशा प्रथा, परंपरांकडे चिकित्सकपणे पहावं, एवढीच माफक अपेक्षा आहे.
दरम्यान, नवस हाच मुळात अंधश्रद्धेचा भाग असून, पेटत्या विस्तवावरून वेगाने चालत गेल्यास पायाला चटका बसत नाही असं अंनिसचे म्हटलं आहे. आजच्या वैज्ञानिक युगात आपण कितीही पुढारलो असलो तरी आजही अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणही अशा प्रथा पंरपरा जोपासताना दिसतात.
हे ही वाचा :
Latur Muharram : एकही मुस्लिम कुटुंब नाही, पण लातुरातील नांदगावात होतोय मोहरम