Nanded News: मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पोस्ट टाकल्याच्या वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेत हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची बदली करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सकल मराठा समाजाकडून नांदेड येथे पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलंय.
हिंगोलीतील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी मराठा समाजातील काही तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा मराठा समाजाचा आरोप असून जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या बदलीसाठी आयजी ऑफिसमध्येच आंदोलकांनी ठिय्या केला. यात मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी तसेच पोलीस निरीक्षकाची बदली करावी या मागणीसाठी आंदोलकांनी 25 जुलै रोजी आंदोलनाचा इशारा दिलाय.
हिंगोलीत गोळीबाराची घटनेनंतर मराठा आंदोलक आक्रमक
हिंगोली जिल्ह्यात जरांगे पाटील यांच्या विरोधात समाज माध्यमावर टाकलेल्या पोस्टमुळे झालेल्या वादातून गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेअंतर्गत मराठा समाजातील काही तरुणांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी मराठा समाजातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले असा मराठा समाजाचा आरोप आहे. पोलिसांकडून एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप करत आज नांदेड येथे विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेत मागण्या पूर्ण न झाल्यास 25 जुलैला आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजातील आंदोलकांनी दिलाय.
मराठा आंदोलकांच्या या प्रमुख तीन मागण्या
हिंगोली जिल्ह्यात झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले असून नांदेड मधील पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर आज शेकडो मराठा आंदोलकांनी या तीन प्रमुख मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले.
१) हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची बदली करावी
२ )गोळीबार प्रकरणात पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली असून मराठा तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत.
३)हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावे