Nanded : समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड-जालना मार्गाचे (Nanded Jalna Samruddhi Highway ) काम रेंगाळल्याने हा रस्ता होणार की नाही अशी शंका उपास्थित झाली आहे. या रस्त्याचे काम सुरु असून थोड्या धिम्या गतीने सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाची बैठक घेऊन गुत्तेदाराला काळया यादीत टाकण्याची वॉर्निंग दिल्याची प्रतिक्रिया नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्ते विकासाबाबत नेहमी आढावा बैठक घेतात, निधी उपालब्ध करुन काम लवकर करण्यात येईल असे सावे म्हणाले.
अडीच वर्षात तुम्ही काय केले हर्धवर्धन सपकाळ यांना सावे यांचा प्रतिसवाल
दरम्यान, यावेळी बोलताना अतुल सावे यांनी काँग्रेसवरही टीका केली. अडीच वर्ष सरकारमध्ये होते तेव्हा काय केलं याच उत्तर पहिले द्यावं मग आम्हाला प्रश्न विचारावा, असा प्रतिसवाल मंत्री अतुल सावे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना केला. शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देता येत नसतील तर खुर्च्या खाली करा असे सपकाळ म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला सावे यांनी प्रतित्युत्तर दिले आहे.
मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मदतीबाबत निर्णय घेणार, सावेंची माहिती
मुसळधार पावसामुळं नांदेड जिल्ह्यातील शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. आज पालकमंत्री अतुल सावे यांनी केळीबागांच्या नुकसाणीची पाहणी केली. 9 जून रोजी वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात केळी बागांचे मोठे नुकसान झाले होते. नांदेड मध्ये 4 हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे. आज पालकामंत्री अतुल सावे यांनी अर्धापूर तालुक्यातील शेनी आणि लहान येथे जाऊन पाहणी केली. मोठे नुकसान झाले असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मदतीबाबत निर्णय घेणार असल्याचे सावे म्हणाले.
राज्यातील अनेक ठिकाणी सध्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. मात्र, काही भागात ठेकेदार मनमानी कारभार करत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक भागात अत्यंत धिम्या गतीनं काम सुरु आहे. यामुळं लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेकेदारांना सूचना दिल्याची माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या: