मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटप, निवडणुकीची रणनीती आणि नाना पटोले यांना भावी मुख्यमंत्री म्हणून बघितल्या जात आहे, यावर प्रफुल पटेल यांनी केलेल्या टीकेवर नाना पटोलेंनी सडेतोड उत्तर देत पटेलांवर निशाणा साधला. यासोबतचं भावी मुख्यमंत्री पदावरून नाना पटोले यांनी प्रफुल पटेल यांनी आपल्या जिल्ह्यातील पोरगा मोठा होत असेल तर त्याला आशीर्वाद द्यावा असं वक्तव्य करून पटोले यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री पदाबाबत इच्छा व्यक्त केली.
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, महायुती सरकारनं मराठा समाजाला फसवलं त्याच्याबद्दलं आक्रोश बघायला मिळत आहे. 2014 मध्ये याच देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांनी आमचं सरकार राज्यात आणि केंद्रात आलं की मराठा समाजाला आरक्षण देऊ धनगर, गोवारी समाजाला आरक्षण देऊ... पण आज आपण बघतोय, कुठल्याही समाजाला आरक्षण नं देता त्यांच्यात ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी, गोवारी विरुद्ध आदिवासी असे केले आहे. ज्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी समाजा समाजामध्ये, जाती जातीमध्ये भांडण लावलीत त्यांना त्याचे परिणाम भोगावेचं लागेल.
प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावं, असं वाटणं स्वाभाविकचं : नाना पटोले
प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावं, असं वाटणं स्वाभाविकचं आहे. प्रफुल पटेल यांना एका गोष्टीचा आनंद व्हायला पाहिजे की, आपल्या जिल्ह्यातला पोरगा मोठा होतोय. त्याला आपण आशीर्वाद दिला पाहिजे.असे देखील नाना पटोले म्हणाले.
जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही : नाना पटोले
जागावाटपावर बोलताना नाना पटोले म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेचे प्रश्न घेऊन महाराष्ट्र काँग्रेस कमिटी मैदानात उतरणार आहे. केंद्रातलं नरेंद्र मोदी यांचं महाभ्रष्टाचारी आणि महायुतीचं जे सरकार आहे, गुजरात धार्जीनी जे सरकार आहे. या सरकारचा खरा चेहरा आम्ही जनतेसमोर मांडू आणि निवडणुकीला सामोरे जाऊ. जिथे मेरिट असेल तिथं त्या त्या पक्षाला जागा देण्याचा निर्णय झालेला आहे. 60-70 जागांचा अजूनही निर्णय झालेला नाही आणि मला विश्वास आहे की, मेरिटच्या आधारावर योग्य निर्णय होईल.
हे ही वाचा :
अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या चर्चा असलेल्या 'त्या' आमदारावर काँग्रेसची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित, काय आहे प्रकरण?