Nana Patole : राजकारणी लोक म्हणजे निर्दयी, कटू आणि कटकारस्थानी अशी प्रतिमा समाजात निर्माण झालेली असताना सोलापुरात मात्र नाना पटोले (Nana Patole) यांच्या दर्यादिलीचे उदाहरण समोर आले आहे. ह्रदयविकाराने त्रस्त असलेल्या एका चिमुकलीसाठी नाना पटोलेंनी चक्क आपले हेलिकॉप्टरच देऊ केले. 


नाना पटोलेंची दर्यादिली
सोलापुरात ह्रदयविकार असलेली एक चिमुकली चक्क हॅलिकॉप्टरने प्रवास करतेय. सोलापुरातून अशा प्रकारे रुग्णांना सेवा देणारी कोणती यंत्रणा सुरू झालीय. असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल. पण आजची बातमी वाचून तुम्हाला आश्चर्य तर वाटेलच पण राजकारण्यांच्या विषयी आदराची भावना देखील वाढेल. सोलापुरातली उंजल दासी ही चिमुकली ह्रदयाला छिद्र असल्याने मृत्यूशी झगडतेय, तिच्या ह्रदयावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याची गरज होती आणि नेमकं त्याचं दिवशी नाना पटोलेंचं हेलिकॉप्टर सोलापुरात उतरलं. नाना पटोलेंना ही गोष्ट कळताच त्यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता स्वत: ज्या हेलिकॉप्टरमधून सोलापुरात मेळाव्यासाठी आले होते, ते हेलिकॉप्टर त्या चिमुकलीला मुंबईला जाण्यासाठी देऊन टाकले.


 



मोठ्या मनाची माणसंसुध्दा राजकारणात
उंजलीचे वडील तुकाराम दासी हे सोलापुरात शिलाई कामगार म्हणून काम करतात. राहायला स्वतःच घर देखील नाहीये, त्यामुळे भाड्याने एमआयडीसी परिसरातच राहतात. उंजली जन्मल्यापासून तिला हृदयविकार आहे, डॉक्टरांनी उपचार करण्यासाठी सांगितले. मात्र परिस्थिती नसल्याने खासगी रुग्णालयात उपचाराचा खर्च देखील शक्य नाही. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदेनी पुढाकार घेत मुंबईत मोफत उपचाराची सोय उपलब्ध करून दिलीय. प्रणिती शिंदे आणि नाना पटोले यांनी केलेल्या कामामुळे उंजलीचे नातेवाईक त्यांना मनापासून धन्यवाद देत आहेत. राजकारणात द्वेष आणि कटकारस्थानांसारखे आणि निर्दयी प्रकार नेहमीच आपल्याला घडताना पाहायला मिळतात मात्रं काही मोठ्या मनाची माणसंसुध्दा राजकारणात अजून आहेत हे पाहून समाधान वाटतं.


संबंधित बातम्या :