मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. मतदार याद्या दुरुस्तीचे काम सुरू असून नवीन याद्यांमध्ये अनेकांची नावे आणि फोटो गायब असल्याचे समोर आले आहे.  एवढेच नाही तर कल्याण मधील एका माजी नगरसेवकाचेच नाव गायब झाल्याचे समोर आले आहे. नाव वगळल्याने या माजी नगरसेवकाने निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला असता कल्याण पश्चीमचे आमदार विश्वनाथ भोईर, त्यांचे भाऊ आणि मुलाचे नाव स्थलांतरीत करण्याचासाठी कोणीतरी परस्पर अर्ज भरल्याची माहिती समोर आली आहे. ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने भोईर यांचे नाव स्थलांतरीत करण्यासाठी करण्यात आलेला अर्ज रद्द करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.    


कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कल्याण पश्चिमचे 4 लाख 78 हजार मतदार आहेत. कल्याण पूर्व 3 लाख 57 हजार, कल्याण ग्रामीण मध्ये 4 लाख 40 हजार मतदार आणि डोंबिवली 3 लाख 72 हजार, असे चार विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण 16 लाख 49 हजार 270 मतदार आहेत. त्यापैकी  कल्याण पश्चिमेत 1 लाख 22 हजार, कल्याण पूर्वेत 92 हजार 192, कल्याण ग्रामीणमध्ये 82 हजार 364 आणि डोंबिवलीत 1 लाख 17 हजार 92 मतदार अशा एकूण 4 लाख 13 हजार मतदारांची यादीत छायाचित्रे नसल्याचे समोर आले होते. त्यापैकी 1 लाख 67 हजार 909 मतदारांची नावे मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर ते राहत नसल्याने वगळण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आलीय. 


कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून सद्य स्थितीला 1 लाख 22 हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी शासनाकडून वारंवार शिग्र घेण्यात आली, जनजागृती सुरू आहे असं स्पष्टीकरण निवडणूक अधिकाऱ्याकडून देण्यात आलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र मतदार यादी पाहता गोंधळाचे वातावरण निर्माण झालंय. 


केडीएमसीचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी त्यांच्या कार्यालयात मतदार नोंदणीची तपासणी केली असता त्या मतदार यादीत चक्क त्यांचे स्वत:चेच नाव नसल्याचे आढळून आले. उगले यांनी निवडणूक अधिकारी वर्षा थळकर यांची भेट घेतली असता ही चूक दुरुस्त केली जाईल असे आश्वासन दिले. इतकेच नाही तर कल्याण पश्चीमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे भाऊ आणि मुलगाचे नाव स्थलांतरीत करण्याचासाठी त्यांच्या परस्पर अर्ज देण्यात आला होता. याबाबत आम्हाला संशय आल्याने आम्ही थेट आमदारांशी विचारणा केली. त्यावेळी आमदारांनी आपण यासाठी अर्ज भरला नसल्याचे सांगितले. त्यानंतर हा अर्ज रद्द करण्यात आल्याचे निवडणुक अधिकाऱ्यांनी सांगितले. 


दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्याने लोकप्रतिनिधींची नावे जर मतदार यादीतून गायब होत असतील तर सर्वसामान्य मतदारांचं काय? असा सवाल आता उपस्थित होतोय.  


महत्वाच्या बातम्या


कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीवर केडीएमसीचा मेगा प्लॅन, लांब पल्ल्यांच्या एसटी बसला बंदी