पोलिसांच्या ताटात 9 पदार्थांचे आश्वासन असताना फक्त 2 पदार्थच पोलिसांना देण्यात आले. हे दोन पदार्थ म्हणजे फक्त वरण आणि भातावर बोळवण करण्यात आली.
चपाती, 2 भाज्या, सलाड, मिठाई, लोणचे, पापड यापैकी एकही पदार्थ पोलिसांना मिळाला नाही.

इतकंच नाही तर, उभं राहून, नेहमीच सतर्क असणाऱ्या पोलिसांना सकाळचे जेवण दुपारनंतर म्हणजेच साडे तीन वाजता देण्यात आले.
यावरुनच सरकार तुपाशी आणि सरकारच्या सुरक्षेसाठी तैनात हजारो पोलीस उपाशी, असं चित्र नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं.
जर पोलीस सशक्त असेल, तर समाज सशक्त, सुरक्षित राहील. मात्र पोलिसांनाच जर दुपारी तीन-साडेतीन वाजता जेवण मिळणार असेल, तर पोलीस आपली शारीरिक क्षमता कशी टिकवून ठेवणार आणि समाजाचं रक्षण कसं करणार हा प्रश्न आहे.