हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशन सुरु होण्याआधीच कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवरुन विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी घोषणा दिल्या.
कर्जमाफीबाबत बँकेत शहानिशा केल्यावर शेतकऱ्यांची फक्त नावं आली आहेत., मात्र अजूनही पैसे जमा झालेले नाहीत., असं सांगण्यात आल्याचा दावाही यावेळी अजित पवारा यांनी केला आहे.
LIVE UPDATE
सरकारने विधानसभेत मांडल्या 26 हजार 402 कोटींच्या पुरवण्या मागण्या
-त्यामध्ये 15 हजार कोटी शेतकरी कर्जमाफीसाठी
- कर्जमाफीसाठी सर्वसाधारण अर्थसंकल्पातून 13 हजार कोटीची तरतूद
- आदिवासी आणि मागासवर्गीय विभागाच्या योजनांचे २ हजार कोटी रुपये सरकारने पुरवणी मागण्यात कर्जमाफीसाठी वळवले
- पुरवणी मागण्यात मागासवर्गीय आणि आदिवासी योजनांचे प्रत्येकी १ हजार कोटी असे २ हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी वळवले
- यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
- आतापर्यंत कर्जमाफीसाठी एकूण ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद
पोटनिवडणुकीसाठी परिणय फुके यांची विचारणा
- नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी परिणय फुके यांनी केली विचारणा, पण परिणय फुके इच्छुक नाहीत
- मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असलेले परिणय फुके यांना पहिली पसंती भाजपने दिलेली, पण फुके यांनी नकार दिला
- काँग्रेस आता कुणाला उमेदवारी देणार त्यानुसार भाजप उमेदवार ठरवणार
पीएंना प्रवेशबंदी
- नागपूरच्या अधिवेशनात लॉबीत आमदारांच्या पीएला प्रवेशबंदी, विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंतचं प्रवेश
- विधानभवनाच्या पायऱ्यांवरच पीएंना ताटकळत राहवे लागतेय
- अध्यक्षांच्या आदेशामुळे आमदारांच्या पीएमध्ये नाराजी
- आमदार अब्दुल सत्तार यांनीही घेतला आक्षेप
मुख्यमंत्र्यांचे भाषण
तुमच्या सरकारने अख्या विदर्भाला जेव्हढी कर्जमाफी दिली, तेव्हढी आम्ही एकट्या बुलढाण्याला दिली.
तुम्हीं शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली
शेतकरी आत्महत्या होत्या ही तुमच्या सरकारची पापं
शंभर नव्हे तर 1000 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ
जे सांगू ते खार सांगू
विरोधक आक्रमक
- नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, विरोधकांची घोषणाबाजी
- शंभर टक्के कर्जमाफी झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज सुरू होऊ देणार नाही- विरोधक आक्रमक - विधानसभेत गदारोळ
- राज्यसमोर कर्जमाफीचा प्रश्न महत्वाचा
- तारीख पे तारीख सुरू आहे
- शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत
- मुख्यमंत्री म्हणतात 41 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, मुख्यमंत्र्यांनी 100 रुपयांचा स्टॅम्प पेपरवर हे लिहून द्यावं