आदिवासी आणि दलितांचं आरक्षण धोक्यात : सोनिया गांधी

 

देशाला संघ आणि भाजपच्या विचारांपासून धोका : सोनिया गांधी

 

आरएसएसच्या इशाऱ्यावर देशाचा कारभार : सोनिया गांधी

 

काँग्रेसची सरकारं पाडण्याचा मोदींचा डाव : सोनिया गांधी

 

भाजप विभाजनाचं राजकारण करतंय, सोनिया गांधींची टीका

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत : सोनिया गांधी

 

संघाच्या विचारधारेसमोर कधी झुकणार नाही, देशाला कोणापुढे झुकू देणार नाही : राहुल गांधी

 

सरकार केवळ मनुविचाराच्या रक्षणाला प्राधान्य देतं : राहुल गांधी

 

रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे, बलिदान : राहुल गांधी

 

आंबेडकरांनी उपस्थित केलेले प्रश्नच रोहित वेमुलाने मांडले : राहुल गांधी

 

मनुच्या विरोधातला लढा हा आंबेडकर आणि काँग्रेसचा : राहुल गांधी

 

नागपूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त नागपुरात आज काँग्रेसची विराट सभा होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे या सभेला संबोधित करणार आहे.

 

या सभेला काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असून नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये ही विराट सभा होणार आहे. तर सभेला सुमारे एक लाख कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार असण्याची शक्यता आहे.

 

राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांना आणण्यासाठी काँग्रेसने सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सभेत काँग्रेस भाजप सरकारवर निशाणा साधणार हे निश्चित आहे.

 

सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा दौरा

राहुल गांधींचं 3 वाजता नागपुरात आगमन होईल
तर सोनिया गांधी 3.30 वाजता नागपूरमध्ये दाखल होतील.
यानंतर 3.45 वाजता दोघेही दीक्षाभूमीला दर्शनासाठी जातील.
5.30 वाजता कस्तूरचंद पार्कमध्ये होणाऱ्या सभेच्या ठिकाणी पोहोचतील.