अहमदनगर: अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये पतीने आपल्याचं पत्नीची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आश्विनी अकोलकर असं या मृत महिलेचं नाव असून देव दर्शनाला जाण्याच्या बहाण्याने पती मच्छिंद्र अकोलकरने आपल्या पत्नीची गळा चिरुन हत्या केली.


 

गुरुवारी रात्री मढीला देव दर्शनाला जाण्याचं निमित्त करुन पत्नीला कारमध्ये बसवलं. तीसगाव-करंजी दरम्यान मध्यरात्री पतीनं पत्नीचा गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर चालकाला धमकावून कार जामखेडच्या घाटात नेऊन पेट्रोल ओतून पत्नीला जाळलं. या घटनेनंतर पती मच्छिंद्र अकोलकर फरार झाला आहे. मात्र, गाडीचा चालक बाबासाहेब मराठेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

जाळलेली गाडीही पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस सध्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.