नागपूर : नागपुरात दिवाळीच्या दिवशी अंधश्रद्धेतून झालेल्या वादामुळे अल्पवयीन तरुणाचा मृत्यू झाला आहे. डीजेवर देवीचं गाणं लावल्याने पत्नीच्या अंगात देवी येत असल्याचा आरोप करत शेजाऱ्याने वाद घातला होता.


होम थिएटरवर देवीचं गाणं का वाजवता, त्यामुळे माझ्या पत्नीच्या अंगात देवी येते, असं या कारण काढून शेजाऱ्यानं 17 वर्षीय तरुण आणि त्याच्या वडिलांशी वाद घातला. चौघा जणांनी बापलेकावर हल्ला चढवत त्यांना मारहाण केली.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याचे वडील गंभीर जखमी असून त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. पूजेची तयारी सुरु असताना वाद झाला.

नागपुरातल्या पुंजाराम वाडीत ही घटना घडली. हत्याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांना अटक करण्यात आली आहे.