Nagpur Ncp News : नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक दिवसीय चिंतन शिबिर पार पडत आहे. या शिबिराच्या ठिकाणी लावण्यात आलेला एक फ्लेक्स सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी साहेब, दादा, ताई तुम्ही पुन्हा एक व्हा असा मजकुर या फ्लेक्सवर लिहण्यात आला आहे. त्यामुळं हा फ्लेक्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. पक्षाचे मुंबईतील पक्षाचे सरचिटणीस राजू घुगे आणि दिनेशचंद्र हुलवळे यांनी हा फ्लेक्स लावला आहे. 

Continues below advertisement


पुन्हा एक व्हा! तुमच्या चरणांशी नतमस्तक होऊन हात जोडून विनंती करतो


साहेब दादा ताई आम्ही आहोत सदैव तुमच्या सोबत, पण त्यासाठी तुम्हाला एकत्रच पाहायला आवडेल आम्हाला असे फ्लेक्सवर लिहण्यात आलं आहे. त्याचबरोबर झाले गेले गंगेला मिळू द्या महाराष्ट्रहितासाठी साहेब, दादा, ताई पुन्हा एक व्हा. तुमच्या चरणांशी नतमस्तक होऊन हात जोडून विनंती करतो तुम्हाला माझ्या देशासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी पुन्हा एक व्हा! पुन्हा एक व्हा! पुन्हा एक व्हा असा मजकुर फ्लेक्सवर लिहला आहे. 


महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय भविष्यास आकार देणारा महत्वाचा टप्पा म्हणजे हे चिंतन शिबीर : तटकरे


दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर महत्वाचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्पण हे केवळ जनतेच्या सर्वांगीण विकासाप्रती असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे. आमचे राजकारण निवडणुका जिंकण्यापुरते मर्यादीत नाही तर समाजात दिर्घकालीन बदल घडवणं हेच आमचं मुख्य ध्येय असल्याचे तटकरे म्हणाले. महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय भविष्यास आकार देणारा महत्वाचा टप्पा म्हणजे हे चिंतन शिबीर आहे. मुल्याधिष्ठित पण आधुनिक गरजांना प्रतिसाद देणारी राष्ट्रवादी घडवणं हे शिबीराचे मुख्य ध्येय असणार आहे, असं तटकरे म्हणाले. 


दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? असा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र, दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी याबाबत काही सांगितले नाही. अनेक कार्यकर्त्यांना दोन्ही पवारांनी एकत्र यावं असे वाटत आहे. तशी इच्छा देखील कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे. तसेच काही नेत्यांनी आमदारांनी देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्याच अनुषंगाने आज नाशिकमध्ये लागलेले बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Gopichand Padalkar & Sharad Pawar: शरद पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, पवार म्हणजे कारस्थानाचा कारखाना: गोपीचंद पडळकर