नागपूर : मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण द्यावं या मागणीसाठी गुरुवारी नागपूरमध्ये भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला राज्यभरातून मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव उपस्थित होते.


जमीयत ए उलेमा हिंदच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमधील इंदोर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. मात्र एलआयसी चौकावर पोलिसांनी मोर्चा अडवला. त्यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केलं.

त्यानंतर एका शिष्टमंडळानं मागण्यांचं निवदेन सरकारला दिलं. मुस्लिमांना आरक्षण द्यावं, गोहत्या बंदीच्या नावाखाली मुस्लिमांवर होणारा अत्याचार थांबवावा, शरिया कायद्यात सरकारनं कुठलाही हस्तक्षेप करु नये अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.