पुणे: तत्कालीन राज्यमंत्री सुनील देशमुख यांच्या अवमानप्रकरणी अमरावतीचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यावर विधानसभेनं कारवाईची शिफारस केली. त्यानतंर नाराज झालेल्या चंद्रकांत गुडेवार यांनी स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली. आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही. असा दावा थोड्यावेळापूर्वी 'एबीपी माझा'शी बोलताना गुडेवार यांनी केला. गुडेवार सध्या पुण्यात ग्रामीण विकास उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.


अमरावतीमध्ये आयुक्त असताना गुडेवार यांनी तत्कालीन राज्यमंत्री सुनील देशमुख यांचा अवमान केल्याचा आरोप आहे. याबाबतचा अहवाल आज सभागृहानं स्वीकारला. गुडेवार यांना सभागृहात बोलावून मुख्य सचिवांकडून समज देण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसंच त्यांना कोणत्याही कार्यकारी पदावर नियुक्त केलं जाऊ नये अशी शिफारसही केली. त्यामुळे नाराज झालेल्या गुडेवारांनी स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात एका प्रामाणिक अधिकाऱ्याची गळचेपी होते काय? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

अमरावतीमध्ये आयुक्त असताना चंद्रकांत गुडेवार यांनी विधानसभा सदस्य (माजी राज्यमंत्री) डॉ. सुनील देशमुख यांचा अवमान केल्याच्या त्यांच्यावर आरोप करण्यात आल होता. याप्रकरणी त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याबाबतचा अहवाल आज सभागृहानं स्वीकारला.

चंद्रकांत गुडेवार यांच्यावर कारवाईसाठी कोणत्या शिफारसी?

  • सभागृहात बोलावून मुख्य सचिवांकडून समज देण्यात यावी


 

  • गुडेवार यांना दिवसभर सभागृहात बसवून ठेवावे.


 

  • कोणत्याही कार्यकारी पदावर नियुक्त केलं जाऊ नये