Nagpur News : संत्रानगरीत अर्थात नागपुरात 1974 नंतर प्रथमच भारतीय विज्ञान परिषदेचे (इंडियन सायन्स काँग्रेस) आयोजन करण्यात आले आहे. 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला (Nagpur University) मिळाले आहे. 3 ते 7 जानेवारी दरम्यान विद्यापीठ परिसरात आयोजित या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली परिषदेच्या आयोजनासंदर्भात आढावा घेण्यात आला. 


दरवर्षी भारतातील प्रमुख शहरामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे (Indian Science Congress) या परिषदेचे आयोजन केले जाते. कृषी, वने, प्राणी, मत्स्य, पशुशास्त्र, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र पर्यावरण माहिती तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, सांख्यिकी, वैद्यकीय विज्ञान, नवीन जीवशास्त्र, अशा 14 विविध विभागांवर नवनवीन शोध प्रबंध, भव्य प्रदर्शनी, मार्गदर्शन आणि यामध्ये तज्ञांचा सहभाग, अशी विज्ञानाला समर्पित व्यापकता या संमेलनाची असते. 


यापूर्वी 1974 मध्ये नागपुरात (Nagpur) 61 वी सायन्स काँग्रेस झाली होती. जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवर शास्त्रज्ञ, संशोधक या काळात नागपूर शहरात असतील. याशिवाय गेल्या काळात महत्वपूर्ण संशोधन करणाऱ्या प्रमुख संस्था या ठिकाणी प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. देश विदेशातील वैज्ञानिकांचा समावेश आणि त्यांच्यासोबत विज्ञानात प्रगती असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संवादही या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. या संमेलनामध्येच राष्ट्रीय किशोर विज्ञान संमेलन देखील घेण्यात येते. यासाठी किशोर वैज्ञानिकही नागपुरात मुक्कामी असतील. राष्ट्रीय स्तरावरील या संमेलनाच्या आयोजनाबाबत आज झालेल्या बैठकीला नागपूर जिल्हा प्रशासन, नागपूर महानगरपालिका, पोलीस प्रशासन, नागपूर विद्यापीठ आणि अन्य प्रमुख संस्थांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. 


आढावा बैठकीत विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, यांच्यासह नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु एस. आर. चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, उपायुक्त आशा पठाण, प्रदीप कुलकर्णी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राम जोशी, पोलीस उपायुक्त एम. सुदर्शन, निरीच्या मुख्य संशोधक पद्मा राव, निरीच्या विज्ञान सचिव डॉ. रिटा दोदाफकर, मनपाचे अभियंता वाईकर, विज्ञान परिषदेचे स्थानिक सचिव जी. एस. खांडेकर, राजेश सिंग उपस्थित होते.


ही बातमी देखील वाचा


Cyber Crime: तुमच्या डॉक्युमेंटचा दुरुपयोग नाही ना? आयडीवर किती सिम आहेत अॅक्टिव्ह, असे पाहा