नागपूर : दिवाळीचे कपडे खरेदी करु न दिल्याच्या रागातून 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. नागपुरातील पल्लवी करडभाजने या तरुणीने गळफास घेतला.

नागपुरातल्या वसंत नगर भागात पायल कुटुंबासोबत राहत होती. महाविद्यालयीन शिक्षण घेणारी पल्लवी ही घरातील सर्वात मोठी मुलगी असून तिच्यापाठीमागे एक बहीण आणि लहान भाऊ आहे, तर वडील शेतकरी आहेत.

पल्लवीने मंगळवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दिवाळीच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या खरेदीवरुन तिचा कुटुंबीयांशी वाद झाला होता.  याच कारणास्तव तिने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

आत्महत्येपूर्वी पल्लवीने कुठलीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.