विपीन तलमले वाघ बघण्यासाठी थेट जीपच्या टपावर चढला होता. यावेळी वाघ त्याच्या समोर येऊन उभा ठाकला. विशेष म्हणजे वाघ जीपच्या मागच्या बाजूला होता. त्यामुळे ड्रायव्हरला त्याचा अंदाजही नव्हता.
यानंतर ड्रायव्हरनं पार्किंग लाईट्स लावल्यामुळे वाघाचं लक्ष थोडं विचलित झालं. मात्र कर्मचाऱ्याचं नशीब बलवत्तर म्हणून वाघ तिथून शांतपणे निघून गेला. अन्यथा हे धाडस कर्मचाऱ्याच्या जीवावरही बेतू शकलं असतं.
उमरेड अभयारण्यात जीपच्या टपावर बसून वाघाचे फोटो
वनक्षेत्रात अशाप्रकारे जीपच्या टपावर बसून फोटो काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वनक्षेत्रात टायगर साईटसीईंग करताना कुणालाही वाहनाबाहेर निघता येत नाही किंवा शरीराचा एखादा भागही गाडीबाहेर काढता येत नाही. सुरुवातीला ही व्यक्ती पर्यटक असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यातच ही गाडी वन विभागाची असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागानं तात्काळ पावलं उचलत कारवाई केली.