वनक्षेत्रात अशाप्रकारे जीपच्या टपावर बसून फोटो काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असं असूनही हा पर्यटक जीपच्या टपावर बसून वाघाचे फोटो काढत आहे.
वनक्षेत्रात टायगर साइटिंग करताना कुणालाही वाहनाबाहेर निघता येत नाही किंवा शरीराचा एखादा भागही गाडीच्या बाहेर काढता येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे ही गाडी वन विभागाची असल्याचं स्पष्ट होतंय.
या पर्यटकाचं हे धाडस त्याच्या जीवावरही बेतू शकलं असतं. दरम्यान, वन विभागाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवणाऱ्या या पर्यटकावर कारवाई होणार का, हे पाहणं गरजेचं आहे.