Nagarpanchayat Election : ओबीसी आरक्षण स्थगित झाल्याने निवडणूक दोन टप्प्यांत झाली. ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर न्यायालयाच्या निकालानंतर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात आली. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील 106 नगरपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली, त्यानंतर आता विविध नगरपंचायतीमध्ये नगरध्यक्ष निवडले जात आहेत. यात राष्ट्रवादी पक्षाला मिळालेल्या यशामुळे त्यांचे नगराध्यक्ष दिसून येत आहेत.
गोंदीया जिल्ह्यातील देवरी,सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी येथे आज नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यावेळी देवरी नगरपंचायतीत भाजपचे संजू उके नगराध्यक्ष पदी नेमण्यात आले, तर भाजपच्या प्रज्ञा सांगीडवार उपाध्यक्ष पदी निवडण्यात आल्या. त्यांना 13 मते मिळाली. कााँग्रेसचे सबरजित भाटिया याना 4 मते मिळाली देवरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी भाजपला मतदान केले. तर सडक अर्जुनी नगरपंचायतीत नगराध्यक्ष तेजराम मडावी यांची निर्विरोध निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना डोंगरवार यांची निवड झाली आहे. याठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. तर मोरगाव अर्जुनी नगरपंचायतीत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंजूषा बारसागडे यांची निवड झाली असून उपाध्यक्ष पदी भाजपच्या ललिता टेम्भरे यांची नियुक्ती झाली.
अकोले नगरपंचायतीत भाजपचा नगराध्यक्ष
दुसरीकडे अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी सोनाली नाईकवाडी तर उपनगराध्यक्ष पदी बाळासाहेब वडजे यांची वर्णी लागली. नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आल्याने मतदान प्रकिया पार पडली. त्यात भाजपच्या सोनाली नाईकवाडी यांना 12 मते तर शिवसेना - राष्ट्रवादी आघाडीच्या नवनाथ शेटे यांना 4 मते मिळाली.
कर्जत नगरपंचायतीतही राष्ट्रवादी
अहमदनगरच्या कर्जत नगरपंचायत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा राऊत यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची निवड झाली. राष्ट्रवादीकडून एकमेव अर्ज आल्याने उषा राऊत यांची बिनविरोध निवड झाली. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. कर्जत नगरपंचायतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली यात राष्ट्रवादीला 12 तर काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आणि नगरपंचायतच्या 17 पैकी 15 जागांवर आघाडीला विजय मिळाला. या निवडणुकीच्या आधी भाजपमधून राष्ट्रवादीमद्ये सामील झालेल्या नामदेव राऊत यांची भूमिका सत्ता मिळवण्यासाठी महत्वाची ठरली. त्यामुळे त्यांच्याच घरात नगराध्यक्ष पद गेलं आहे.
जालनामध्ये 'महिलाराज'
याशिवाय जालना जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली, जिल्ह्यातील जाफराबाद,तिर्थपुरी,घनसावंगी येथे नगराध्यक्ष पदाची माळ अपेक्षे प्रमाणे राष्ट्रवादीच्या गळ्यात पडली. तर दुसरीकडे बदनापूर नगराध्यक्ष पदी भाजपच्या मंगल बारगजे यांनी विजय मिळवला. तर मंठा नगरपंचायत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या मीरा बोराडे या बिनविरोध निवडून आल्या. विशेष म्हणजे यावेळी सोडतीप्रमाणे 5 पैकी 4 ठिकाणी नगराध्यक्ष निवडणुकीत महिलाराज आलेलं पाहायला मिळतेय.
हे ही वाचा :
- Ajit Pawar : नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना सरकार मदत करेल ; अजित पवार
- Nagar Panchayat Elections 2022 : नगरपंचायत निवडणुकीत मराठवाड्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष
- Karjat Nagarpanchayat Election Result : कर्जत नगरपंचायतीवर रोहित पवारांची जादू! मिळवली एकहाती सत्ता, राष्ट्रवादी 12 जागांवर विजयी