Uday Samant : कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) प्रत्येक राज्यात आता ओसरू लागलेली आहे. सध्या ऑफलाईन वर्ग भरत आहेत तसेच आता ऑफलाईन परीक्षा (offline exams) घेण्याचा ही मानस आहे. यापुढे जाऊन जर पूर्ण क्षमतेने अथवा 50 टक्क्यांहून अधिक क्षमतेने वर्ग सुरू करायचे असतील तर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि विद्यापीठांचे कुलगुरू (university) यांनी तशी सविस्तर चर्चा करायला हवी. अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. त्यामुळे महाविद्यालये (colleges) पूर्ण क्षमतेने खुली करण्याबाबत सामंतांनी संकेत दिलेत, 

कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव पाठवावा

आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाबाबत बैठक संपन्न झाली. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, संचालक व संबंधित उपस्थित होते. यानंतर सामंत म्हणाले, ज्या ठिकाणी कोरोना आटोक्यात आला आहे. तिथून तसा प्रस्ताव कुलगुरूंनी जिल्हाधिकार्यांमार्फत आमच्याकडे पाठवावा. त्यावर उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग नेमलेल्या तज्ञांशी चर्चा करेल आणि प्रस्ताव आलेल्या भागातील परिस्थिती अनुकूल आहे, असं निदर्शनास आल्यास त्या महाविद्यालयांना तशी मान्यता दिली जाईल. असे सामंत यावेळी म्हणाले. 

कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत होता. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेमध्ये ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या विषाणूचे संकटही समोर होते. मात्र सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दिलासा व्यक्त केला जातोय. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे आता महाविद्यालये पूर्ण क्षमतेने खुली करण्याबाबत मंत्री उदय सामंतांनी संकेत दिले आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra School Reopen : सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु; शिक्षणमंत्र्यांची माहिती

Jitendra Awhad : 'जीव देऊ पण वाचवू'! जितेंद्र आव्हाड यांचा मध्य रेल्वेला इशारा 

Goa Election 2022 : 'देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी' : संजय राऊत 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI