मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 2 हजार 748 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या किंचीत वाढली असून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 5 हजार 806 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 111ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 111 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली.आतापर्यंत 4456 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 3334 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,122 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
राज्यात आज 41 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 41 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 75 हजार 578 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.77 टक्के आहे. सध्या राज्यात 2 लाख 79 हजार 743 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1169 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 67 लाख 57 हजार 238 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत 255 नवे कोरोना रुग्ण आढळले
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 255 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 439 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 115 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 255 रुग्णांपैकी 23 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :