सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे अमेझॉन म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापांचे 49 प्रजाती आहेत. या 49 सापांच्या प्रजातीमध्ये 6 प्रजातीचे साप विषारी आहेत. यात नागराज, घोणस, फुरसे, मण्यार, मलबारी चापदा आणि बांबू चापदा या प्रजातीचे विषारी साप आहेत. दोडामार्ग तालुक्यामध्ये जगातील सर्वात मोठा विषारी साप असणाऱ्या किंग कोब्रा सापाला अधिवास आहे. पश्चिम घाटामध्ये या सापाचा अधिवास असून महाराष्ट्रामध्ये केवळ दोडामार्ग तालुक्यात हा नागराज आढळतो. किंग कोब्रा साप विषारी असून तो लांबीने साधारण 20 फूटांपेक्षा अधिक वाढतो. कर्नाटक, गोवा आणि केरळमध्ये विस्तारलेल्या पश्चिम घाटामध्ये हा साप प्रामुख्याने आढळतो. महाराष्ट्रातील आंबोली दोडामार्ग पश्चिम घाटामधील किंग कोब्राच्या अधिवास क्षेत्र आहे. राज्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच किंग कोब्राच्या नोंदी आहेत. अनेक सर्पमित्र संस्था वस्तीत आलेल्या सापांना जीवदान देत आहे.
पश्चिम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात सापांचा प्रामुख्याने अधिवास आहे. तसेच या सापांना मारणाऱ्या लोकांवरही वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करणे गरजेचे आहे. साप वाचवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती होत आहे. मात्र लोक साप दिसला की घाबरतात. लोकांमध्ये सांपाबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. त्यातूनच लोक साप दिसला की घाबरतात किंवा सापांना मारतात. त्यामुळे जनजागृती होणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच ठिकाणी विविध प्रकारचे साप आढळतात. आता गावोगावी सर्पमित्र झाल्याने लोकवस्तीत आलेले साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले जाते.
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात नागराज, घोणस, फुरसे, मण्यार, मलबारी चापदा आणि बांबू चापदा या प्रजातीचे विषारी साप आढळतात. जिल्ह्यात केलेल्या संशोधनात एकूण 49 सापांच्या प्रजाती सापडतात. बिनविषारी सापडत आंबोलीत उडता सोनसर्प पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटन येतात. पावसाळ्यात नाग, धामण यासारखे साप मिलनासाठी शेतात येतात. तसेच बेडूक, उंदीर, सरडे या भक्षांच्या शोधत साप मानवी वस्तीत येतात. सापांच्या मेंदूचा विकास पूर्णपणे झालेला नसल्याने सापाच्या लक्षात काहीच राहत नाही. त्यामुळे साप दुख धरून ठेवतो वगैरे गैरसमज आहेत. तसेच सापाला माणसाची प्रतिमा ब्लॅक अँड व्हाइट स्वरूपात दिसते. त्यामुळेच सापांना 6 फुटापलीकडे अंधुक किंवा फिकट दिसायला लागले. अश्या वेळी सापाला कुणाला लक्षात ठेवणे अवघड जाते. सांपाबद्दल गैरसमज दूर ठेवून साप निसर्गात किती महत्वाचा आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.