CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय (Maharashtra budget session) अधिवेशनात पहिल्यांदा संबोधित केलं. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याने घेतलेल्या नव्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करुन, मुंबईतील गरिबांना हक्काची घरं मिळायलाच हवीत, सरकारचीही तशीच भूमिका आहे, असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री म्हणाले, "मुंबईत राहणारे कष्टकरी आहेत. कष्टकरी दुसऱ्यांची घर बांधतात, मात्र त्यांना पाठ टेकायला घर नसतं. १९९५ मध्ये सत्ता होती त्यावेळी योजना आणली होती. यापूर्वी मुंबईच्या विकासाचा विचार केला नव्हता. केंद्र सरकारमुळे धारावीचा विकास होऊ शकला नाही. मुंबईला नेहमीच सोन्याचं अंडे देणारी कोंबडी म्हणून विचार केला. तिची निगा राखण्याचा विचार कोणी केला नव्हता तो विचार आम्ही केला. काही योजना जाहीर केल्या मात्र काही योजनांचा विचार केला नव्हता. धारावीचा विकास होऊ शकला नाही कारण जमीन हस्तांतरण बाकी आहे.
आमदारांसाठी 300 घरं
लोकांच्या घरांचा प्रश्न आणि लोकप्रतिनिधी यांच्या घराचा ही प्रश्न आहे. आमदारांना घरेही मिळणार आहेत. आमदारांसाठी 300 घरं बांधणार आहोत, सर्वपक्षीय आमदारांना घरं आवश्यक आहेत, आमदारांनाही चांगल्या घरांची गरज, कायमस्वरुपी घरं देणार, असं मुख्यमंत्री म्हणाले. आपण विचार करुन घोषणा करतो त्यानंतर काम करतो. पत्राचाळ अनेक दिवसांचा प्रश्न होता. झिम्मा फुगडी सुरु होते. आता त्या कामाला सुरुवात झाली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी छोटं का होईना पण भाषण केलं याचा आनंद आहे असा टोला फडणवीसांनी लगावला. यानंतर फडणवीसांनी मुंबईत झालेल्या घोटाळ्यांची यादी वाचून दाखवली. छोटं का होईन भाषण ऐकायला मिळालं याचा आनंद आहे. महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करतंय असं ते म्हणतात. मात्र या सरकारने बांधावर जाऊन हेक्टरी ५० हजार रुपये मिळायला हवे असं आश्वासन दिलं होतं, त्याबद्दल आता बोलायला नको. ना नवे प्रकल्प, ना नवे योजना, सुरु प्रकल्प बंद, केवळ टीका, आरोप, टोमणे या पलिकडे काहीच नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विं दा करंदीकर यांची कविता सादर केली. याशिवाय फडणवीसांनी कवि पी एल बामनिया यांची कविता सादर केली.
तुम चाहो तबेलो को बाजार कह दो, तुम चाहो पतझडो को बहार कह दो। तुम्हारा ही राज है अभी यहाँ पर, तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो।, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
महत्वाच्या बातम्या :
मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण महाविकास आघाडी कष्टकऱ्यांना घरे बांधून देणार: उद्धव ठाकरे
माकडछाप दंतमंजन, ते तुम चाहो तो स्कूटर को कार कह दो, 2 कवितेतून फडणवीसांचा हल्ला
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live