मात्र या प्रकरणी सिडको पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या या चार जणांनी घडलेल्या प्रकरणाचे खंडण केलं आहे. तसेचं श्रीराम म्हणायला लावण्यावरुन काहीही झालं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. गाडी ओहरटेक करण्यावरुन बाचाबाची झाल्याचं माहिती ताब्यात घेतलेल्या चार जणांनी दिली आहे.
रात्री साडे बारा ते एकच्या दरम्यान दहा ते बारा अज्ञातांनी मुस्लिम झोमॅटो कामगाराला जय श्रीरामचा नारा द्यायला लावत धमकावलं. या घटनेनंतर काही काळ औरंगाबादच्या आझाद चौकात तणावाचे वातावरण होते. मात्र रात्री पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थीती नियंत्रणात आणली. जमावाने या प्रकरणी धमकावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सिडको पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
पण अखेर जय श्रीरामचा नाऱ्य़ावरुन काहीही घडलेलं नसून हा सर्व प्रकार गाडी ओहरटेक करण्यावरुन झालेल्या बाचाबाचीत हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार जणांनी सांगितले आहे.
'जय श्रीराम' म्हणण्यासाठी मुस्लीम तरुणाला मारहाण
एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा इम्रान पटेल हा तरुण कामावरून रात्री घरी परतत असताना हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगर येथे आठ ते दहा तरुणांनी त्याला अडवलं. त्यापैकी एकाने इम्रानच्या मोटारसायकलची चावी काढून घेतली आणि कुठे राहतो असं विचारलं. त्यानंतर टोळक्याने शिवीगाळ करुन जय श्रीराम बोलण्यास जबरदस्ती केली. इम्रानने जय श्रीराम न म्हटल्याने त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या इम्रानने त्यांच्यासमोर जय श्रीराम म्हटलं.
मात्र त्यानंतरही टोळक्याने त्याला मारहाण केली. दरम्यान आरडाओरडा ऐकून जवळील गणेश नावाचा व्यक्ती आणि त्याची पत्नी घरातून बाहेर आले. त्यांनी टोळक्याच्या तावडीतून इम्रानची सुटका केली. घटनेनंतर घाबरलेल्या इम्रानने आज बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.