Wardha Crime: वर्ध्या जिल्ह्यातून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलीय. चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ माजली आहे. ही घटना वर्ध्यात भुगाव नजीक उत्तम गालवा कंपनिसमोर असलेल्या हॉटेलच्या चाळीमध्ये घडली. याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.  


कैकशा खान असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. कैकशा ही गेल्या दोन वर्षांपासून भुगाव येथील उत्तम कंपनीच्या समोर आपला भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करीत होती. तर, तिचा पती इम्रान खान हा ट्रक ड्रायव्हर आहे. कैकशा ही आईसोबत घरी राहत होती. दरम्यान, दररोज यांच्यात वाद होत होता. इम्रान हा कैकशाच्या चारित्र्यावर संशय करायचा. याच मुद्द्यावरून त्यांच्यात मगंळवारी वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर इम्राननं कैकाशाच्या डोक्यात बॅटनं वार केले. तसेच दगडानं ठेचून तिला गंभीर जखमी केले. यात कैकशा इम्रान खान हीचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सावंगी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी इम्रान याला अटक करण्यात आली आहे.


वर्धा: पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालून पतीची आत्महत्या
वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कौटुंबिक वादातून पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घालून पतीनं आत्महत्या केली आहे. आष्टी शहरातील इंदिरा नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून आरोपी पतीचा शोध सुरू असताना त्याने शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. मंगला सुरेश चांगोले (वय, 38 ) असे जखमी पत्नीचं नाव आहे. तर सुरेश रामचंद्र चांगोले (वय, 40 ) असं आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे.  


हे देखील वाचा-