Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) कल्याण ( Kalyan) उपकेंद्राचे नाव धर्मवीर आनंद दिघे मुंबई विद्यापीठ करावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या (Shiv Sena Thackeray group Yuva sena)  सिनेट सदस्यांनी केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याचा निर्णय 2018 च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाला होता. मात्र, सात वर्ष उलटून गेली तरी अद्याप मुंबई विद्यापीठाकडून कल्याण उपकेंद्राचे नामकरण करण्यात आले नाही. त्यामुळं आक्रमक झालेल्या युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रावर जाऊन धर्मवीर आनंद दिघे मुंबई विद्यापीठ उपकेंद्र असं नामकरण करण्याचा प्रयत्न करत तसे मोठे बॅनर उपकेंद्राबाहेर लावले आहे. 

Continues below advertisement


गेल्या आठवड्यात या उपकेंद्राला युवा सेनेच्या सदस्यांनी भेट दिली होती. यामध्ये अनेक त्रुटी आठळून आल्या होत्या. शिवाय या उपकेंद्राचे नामकरण करण्यात आले नसल्याचे मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला होता. गेल्या सात वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याचा विषय प्रलंबित आहे. 2018 च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत आनंद दिघे यांचे नाव देण्याचा निर्णय देखील झाला होता. मात्र, तरी देखील नामकरण करण्यात आले नाही. त्यामुळं ठाकरेंची युवा सेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी युवा सेनेच्या (Shiv Sena Thackeray group Yuva sena)  सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रावर जात मोठा फलक लावत आनंद दिघे यांच्या नावाने घोषणाबाजी केली. 


महत्वाच्या बातम्या:


Pune Station : पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी, मेधा कुलकर्णींच्या प्रस्तावाला विरोध