कोल्हापूर : गेली सहा वर्षे रखडलेली कोल्हापूरची विमानसेवा आजपासून सुरु होणार आहे. मुंबई - कोल्हापूर आणि कोल्हापूर - मुंबई या विमानसेवेतून 30 प्रवासी उडान योजनेअंतर्गत प्रवास करणार आहेत.

कोल्हापूरची विमानसेवा गेल्या 6 वर्षांपासून रखडली होती. अनेक वेळा या विमानसेवेच्या घोषणा झाल्या आणि त्या हवेतच विरल्या. मात्र कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी या सेवेसाठी मोठा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून पुन्हा कोल्हापूर - मुंबई ही विमानसेवा सुरू होत आहे.

मुंबईतून आज दुपारी दोन वाजता विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर या विमानातून कोल्हापूरला येतील. तर कोल्हापूरहून मुंबईला शेतकरी, अनाथ आणि अपंग मुले, कचरा वेचक महिला, तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रवास करतील.

खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत नियोजन केलं आहे.

कोल्हापूरची विमानसेवा अखंडित रहावी यासाठी धनंजय महाडिक यांनी पुढील सहा महिन्यांची विमान तिकिटे घेण्याची तयारी दाखवली आहे.

दुसरा टप्पा

हवाई उड्डान मंत्रालयाने मे महिन्यात कोल्हापूर ते हैदराबाद, तिरुपती आणि बेंगळुरू या नवीन हवाई मार्गाना मान्यता दिली आहे. गो-इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर ते तिरूपती व्हाया हैद्राबाद सेवा दिली जाणार आहे. एअर अलायन्स कंपनीकडून कोल्हापूर ते बंगळुरू ही विमानसेवा दिली जाणार आहे. ही विमानसेवाही पहिल्या टप्प्यात 18  सीटर असेल. दोन्ही विमान कंपन्याकडून ही सेवा देण्याची तयारी सुरू झाली आहे.

VIDEO:


संबंधित बातम्या

कोल्हापूरला अखेर 'पंख' मिळाले, उद्यापासून मुंबईसाठी विमानसेवा