मुंबई : मुंबई (Mumbai) आणि उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून अनेक भागांतील वाहतूक विस्कळित झाली आहे. लोकल सेवाही ठप्प झाली आहे.  तसेच अनेक  एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या.


मुंबई विभागामध्ये जोरदार अतिवृष्टीमुळे रेल्वे प्रशासनातर्फे गाड्या रद्द  करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच ठाणे, माटुंगा या भागात रेल्वे रुळावर पाणी साचले  आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेने नऊ  गाड्या रद्द केल्या आहेत. 


खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहे



  • गाडी क्रमांक 02188 - मुंबई जबलपूर गरिब रथ विशेष यात्रा - प्रवासांची तारीख 18.07.202

  • गाडी क्रमांक 02811 - लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया विशेष यात्रा - प्रवासाची तारीख  19.07.2021 

  • गाडी क्रमांक  02169 - मुंबई नागपूर विशेष विशेष यात्रा -  प्रवासाची तारीख 18.07.2021

  • गाडी क्रमांक  01141 - मुंबई आदिलाबाद विशेष यात्रा - प्रवासाची तारीख 18.07.2021 

  • गाडी क्रमांक  02105 - मुंबई गोंदिया विशेष यात्रा -प्रवासाची तारीख  18.07.2021 

  • गाडी क्रमांक 02109 - मुंबई मनमाड विशेष यात्रा - प्रवासाची तारीख 19 .07.2021 

  • गाडी क्रमांक 07057-  मुंबई सिकंदराबाद विशेष यात्रा - प्रवासाची तारीख 18.07.2021

  • गाडी क्रमांक 02111 -मुंबई अमरावती विशेष यात्रा - प्रवासाची तारीख  18.07.2021 

  • गाडी क्रमांक 07612 मुंबई नांदेड राज्यराणी विशेष यात्रा -  प्रवासाची तारीख  18.07.2021 


पावसाचा परिणाम हा रस्ते वाहतुकीवरही झाला आहे. मुसळधार पावसाने भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली असून त्यामुळे कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. करूळ घाटातही रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी 26 जुलै पर्यंत  यापूर्वीच बंद करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या :