Mumbai-Pune Expressway Missing Link Project : जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या (मीसिंग लिंक) प्रकल्पाला भेट देऊन लोणावळा येथे सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर एबीपी माझाशी त्यांनी संवाद साधला. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यावेळी डिसेंबर 2023 पर्यंत हा होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच येणाऱ्या काळात नागपूर गोवा समृध्दी महामार्ग, मुंबई सिंधुदुर्ग ग्रीन एक्सप्रेस वी, असे अनेक प्रकल्प हाती घेऊन पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी एबीपी माझाला सांगितले.



‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे काम अतिशय आव्हानात्मक होते. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास 500 ते 600 फूट अंतरावर हा बोगदा आहे. बोगद्याची लांबी 8 कि.मी. असून जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याची रुंदी 23.75 मीटर असून देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक रुंदीचा हा बोगदा आहे. मिसींग लिंक प्रकल्पामुळे मुंबई पुणे अंतर पाऊण तासाने कमी होणार आहे. बोगद्यामुळे घाटाचा भाग पूर्णतः टाळला जाऊन अपघातसंख्येत मोठी घट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे प्रवास सुखकर होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल. त्याशिवाय प्रदुषण कमी होणार असून इंधनाची तसेच वेळेची बचत होईल. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. प्रवाशी, वाहने यांच्या सुरक्षेचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. 


मीसिंग लिंक प्रकल्प 


खालापूर ते सिंहगड असा हा मिसिंग लिंक प्रकल्प असेल. 


आता जर आपण पाहिले तर खालापूर ते सिंहगड पर्यंत चे अंतर हे 19 किलोमिटर इतके आहे.


मीसिंग लिंक प्रकल्प सुरू झाल्यानंतर हे अंतर 13.30 किलोमीटर इतके होईल.


एकंदरीत 6 किलोमिटर इतके अंतर या प्रकल्पामुळे कमी होईल तसेच घाटातील अपघात टाळण्यासाठी आणि शून्य अपघात रस्ता बनविण्यासठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. 


साधारण पाऊण तासाची बचत या मार्गामुळे वाचेल.


यातील बोगद्याची एकूण लांबी 10.55 किमी, त्यापैकी 2,5 किमी बोगदा लोणावळा तावलाच्या तळापासून 175 मीटर खालून जातो. 


हा आशिया खंडातील सर्वात रुंद बोगदा असून त्यांची रुंदी 23.75 मीटर आहे.


एकूण 2 ब्रीज, एकाची लांबी 900 मीटर तर दुसरा केवळ स्टेन्ड ब्रीज 650 मीटर लांब असेल.
 
प्रकल्प सुरू झाला मार्च 2019 ला तर डेडलाईन आहे डिसेंबर 2023 ची आहे.


इतर महत्वाची बातमी: 


Cable Stayed Bridge : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर देशातील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रीज, प्रवास होणार आणखी जलद