kirit somaiya : मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांनी समन्स बजावले आहे. त्यानंतर सोमय्या हे मुंबईतल्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजेरी लावणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या संपत्तीची पाहणी केल्याने मला पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. मी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे सोमय्या यांनी सांगितले. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ठाकरे सरकारमधील जे जे घोटाळेबाज आहेत. ज्यांनी ज्यांनी बेनामी संपत्ती जमवली आहे, ती जप्त करुन जनतेला परत देणार असल्याचे सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
मला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजर व्हा म्हणून समन्स आले आहे. ताबडतोब हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. नाहीतर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्या 100 कोटींच्या संपत्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयात मी याचिका दाखल केली होती. त्याच्यामुळे भुजबळांवर कारवाई होऊन ते 2 वर्ष जेलमध्ये गेले होते असे सोमय्या म्हणाले. 4 सप्टेंबर 2021 ला ती संपत्ती बेनामी घोषीत होऊन ती जप्त करण्यात आली होती. त्याच्या पाहणीसाठी किरीट सोमय्या गेले होते आणि त्यासाठी महाशय उद्धव ठाकरे आज मला जेलमध्ये पाठवण्याची भाषा करत आहेत. मी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे सोमय्या यांनी सांगितले. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ठाकरे सरकारमधील जे जे घोटाळेबाज आहेत, ज्यांनी ज्यांनी बेनामी संपत्ती जमवली आहे, ती जप्त करुन जनतेला परत देणार असल्याचे सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, किरीट सोमय्यांना सांताक्रुज पोलीस ठाण्यातून आलेली नोटीस ही कोरोनाची नियमावली असताना गर्दी जमवल्याप्रकरणी आली आहे. त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासंदर्भात हजर राहण्याचे आदेश त्यामध्ये आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती की किरीट सोमय्या यांना एका आठवड्यात जेलमध्ये जाव लागेल. सेनेचे प्रवक्ते संजय राऊत सांगतात की बाप लेक जेलमध्ये जातील. मात्र, आम्ही घाबरत नसल्याचे सोमय्या म्हणाले. छगन भुजबळ यांच्याविरोधात याचिका केली होती म्हणून, भुजबळ दोन वर्ष जेलमध्ये जाऊन आले. मी जेलमध्ये जाण्यास बिलकुल घाबरत नाही असेही सोमय्या म्हणाले.
जी कंपनी ब्लॅकलिस्ट करण्यात आली होती, त्या कंपनीला कशी कंत्राट देण्यात येतात, असा सवालही सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. शिवराळ भाषेचा वापर करून विषय डायव्हर्ट करण्यात येत आहे. पण मी डायव्हर्ट होणार नाही, माझं लक्ष घोटाळेबाजांकडेच राहील असे सोमय्या यावेळी म्हणाले. ईडी संदर्भात जे संजय राऊत बोलतात त्या संदर्भात मी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. संजय राऊत एवढे घाबरले आहेत की ते इतरांचा बाप काढत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना 19 बंगल्यांचा हिशोब द्यावा लागेल असेही सोमय्या यावेळी म्हणाले. माझ्याकडून कोणताही त्रास अन्वय नाईक कुटुंबियांना होत नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Raj Thackeray : 'मराठी भाषा गौरव दिवस इतक्या जोरदारपणे साजरे करा की...' राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र
- Election 2022: मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट, युवकांना केलं 'हे' आवाहन
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा