मुंबई : सोशल मीडियावर कोणताही धार्मिक किंवा द्वेषपूर्ण संदेश पोस्ट करण्यापूर्वी दोनदा विचार करा. महाराष्ट्र पोलीस अशा प्रकारचे मेसेज डिलीट करत असून त्यानुसार पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. राज्यात रामनवमी सण आणि सध्या सुरू असलेला रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस आधीच अलर्टवर होते. परंतु छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या घटनेनंतर आता पोलिस अधिक सतर्क झाले असून खबरदारीच्या उपाययोजना करत आहेत.
सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर पोलिसांची करडी नजर आहे. अशा पोस्ट पोलिसांकडून डिलिट केल्या जात असून त्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
महाराष्ट्रातील विविध शहरे आणि जिल्ह्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना अधिक सतर्कता आणि सर्व खबरदारीच्या उपाययोजना करत आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर येथे आधीच अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच गुन्हा संभाजीनगरमध्ये दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तर मुंबईत काल मालवणीत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य गुप्तचर विभाग आणि विशेष शाखा सतर्क आहेत आणि अशांतता निर्माण करणारी प्रत्येक माहिती गोळा करत असून खबरदारी घेत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावरून आक्षेपचे मेसेज आणि इतर मेसेज डिलीट करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस सायबर पोलिसांची मदत घेत आहेत. सोशल मीडियावरही द्वेषपूर्ण संदेशाचे युद्ध सध्या सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. असे अनेक संदेश आधीच प्लॅटफॉर्मवरून हटवले आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गोंधळ
बुधवारी रात्री अकरा-साडेअकरा वाजेच्या सुमरास काही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला. दोन्ही बाजूने चार-चार मुलं होती. यता एकाबाजूची मुलं निघून गेली, पण गर्दी जमा झाली होती. परंतु पोलिसांनी तत्काळ जमा झालेला जमाव पांगून लावला. हा पहिला टप्पा होता. मात्र त्यानंतर पुन्हा 50-60 लोकं आली, पण ते आक्रमक नव्हते. पोलिसांनी त्यांना देखील पांगवले. पण त्यानंतर एक-दीड तासाने मोठा जमाव झाला. हा सर्व प्रकार तीन-चार तास सुरु होता. ज्यात एक ते दीड तास दगडफेक सुरु होती. म्हणजेच हा सर्व राडा वेगवेगळ्या तीन टप्प्यात झाला.
ही बातमी वाचा: