मुंबई : अंगात मयत मुलाचं भूत आल्याच्या नावाखाली महिलेला भोंदूबाबाने क्रृरतेने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. घटना काल बुधवारी सायंकाळी साडे सातची आहे. तेथील एका नागरिकाने हा मारहाणीचा व्हिडीओ काढला आहे. भोंदूबाबाने ही आपणांकडे भूत पळवण्यासाठी तिच्या पतीने आणल्याच मान्य केलं आहे. सध्या पिडित महिलेची ही मानसिकस्थिती बिघडली आहे.  


पुरोगामी म्हणवणा-या या महाराष्ट्रात चाललयं तरी काय हाच प्रश्न, ही व्हिडीओ क्लिप बघून समोर आला आहे. नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे गावाजवळील आदिवासी पाडयातील ही व्हिडीओ क्लिप आहे. महिलेच्या अंगात भूत शिरलयं आणि ते काढण्यासाठी या महिलेला मोर पंखाच्या गट्याच्या बुडाने  मारहाण करतोय. तिच्या अंगावर पाणी फेकतोय, तिच्या कपाळावर इबित लावतोय. हे सर्व चाळे तो भूत पळवण्याच्या नावाखाली करत होता. आम्ही या भोंदू बाबाला विचारलं तर त्याने त्या महिलेच्या अंगात भूत आलेलं. तिच्या पतीने तिला इथं आणलं सांगतं. मंञ आणि मोर पंखाच्या साहय्याने तिच्या अंगातील भूत काढत असल्याच चक्क मान्य ही केलं.


 नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे गावाजवळील आदिवासी पाडतील हे श्री भैरवनाथ बाबाचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराचा पुजारी हा हेमराज नागदा आहे. त्याच्या म्हणन्यानुसार हे मंदिर 1988 साली स्थापन झालं आहे. या मंदिरात भूत पळवण्याच काम मागील 10 ते 12 वर्षापासून हा भोंदू बाबा करत असल्याच तेथील नागरीकांनी सांगितलं आहे.  


मुंबईला काम करणारी सोनी संजय राजभर ही काही दिवसापासून मानसिक आजारी आहे. काल ती घरी थकलेल्या अवस्थेत आल्यावर तिच्या पतीने तिला भोंदू बाबा हेमराज नागदा याच्याकडे नेलं.  त्या भोंदू बाबाने, तिच्या घराच्या बाजूला राहणारा एक मुलगा जो चार महिन्यापूर्वीच तलावात बुडून मृत्यू  झालेला त्याचा भूत तिच्या अंगात शिरल्याचा जावई शोध लावला आणि त्या महिलेला अमानुष मारहाण सुरु केली. त्या महिलेला पण काहीच कळलं नाही. माञ एका सुज्ञ नागरीकांने या मारहाणीचा व्हिडीओ काढून, या भोंदू बाबाचा भांडाफोड केलायं.  


आजूबाजूच्या नागरीकांना विचारल्यावर हा भोंदू बाबा भूत काढण्याच्या नावाखाली महिला, लहान मुलं पुरुष यांना मारहाण करत असल्याच सांगितलं आहे. यावर आवाज उठवल्यास जातीय रंग देवून, त्याला वेगळ वळण देत असल्याने कुणी पुढे येत नसल्याच सांगितलं आहे.