मुंबई : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) वज्रमूठ सभेनंतर (Vajramuth Sabha) महाविकास आघाडी आता मुंबईत वज्रमूठ आवळणार आहे.मुंबईत महाविकास आघाडीकडून मशाल मोर्चा काढण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.  छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमूठ सभेनंतर महाविकास आघाडी आता मुंबईत वज्रमूठ आवळणार आहे. मुंबईत महाविकास आघाडीकडून मशाल मोर्चा काढण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.


राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी काँग्रेसकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत मशाल मोर्चावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय. येत्या 11 एप्रिलला माहीम ते चैत्यभूमी परिसर असा मशाल मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले. या मोर्चात महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. 


राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी काँग्रेसकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत मशाल मोर्चावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय. येत्या 11 एप्रिलला माहीम ते चैत्यभूमी परिसर असा मशाल मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले. या मोर्चात महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.


महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाचं सरकार विरोधात र महाविकास आघाडीने वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीच्या16 सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली.  या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.   


महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वज्रमुठ सभेत सांगितले. महाविकास आघाडीचा कणा असणारे कार्यकर्ते जीवाचे रान करतील, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. आता पेटून उठावे लागेल, एकाच हातात घड्याळ पंजा आणि मशाल आहे. हा एकोपा टिकविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करणार आहोत, आपणही एकोपा टिकवा, असे आवाहन त्यांनी केले.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वभावामुळे महाविकास आघाडीमध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पटोलेंच्या स्वभावावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये थोरात अशोक चव्हाण योग्य समन्वय साधतात. नानांच्या स्वभावामुळे थोडी अडचण होते, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.