रत्नागिरी: मुंबई- गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक तीन तासांपासून ठप्प आहे.लांजा तालुक्यातील कुवे इथं झाड पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जवळपास तीन तास झाले तरी प्रशासनाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी दाखल झालेला नाही.
त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा वाढत आहेत. झाड हटवल्याशिवाय वाहतूक सुरळीत होणं अशक्य आहे. त्यातच पडलेल्या झाडाने रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भाग व्यापल्याने, एकही वाहन पुढे सरकू शकत नाही.