नवी मुंबई : नवी मुंबई आणि कामोठ्यातील नागरिकांना आज पाणी वापरण्याची गरज आहे. कारण अनेक भागात आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
महापालिकातर्फे आज मोरबे धरण इथलं आपत्कालीन दरवाजाची उच्चलन, उभारणी आणि चाचणी आणि इतर कामं हाती घेण्यात येणार आहेत. या कामासाठी भोकरपाडा इथल्या जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा आज सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत एकूण 12 तास बंद राहणार आहे.
त्यामुळे नवी मुबंई महापालिकातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैराणे, घणसोली आणि ऐरोली या विभागात आज संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही.
तसंच या कालावधीत महापालिक क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा आणि सिडको क्षेत्रातील कामोठे नोडमधील पाणीपुरवठाही बंद राहील. तर गुरुवारी 1 जून 2017 रोजी कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होईल.
दरम्यान या कालावधीत पाणी जपून वापरुन सहकार्य करण्याचं आवाहन नवी मुंबई महापालिकेने केलं आहे.