भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीत प्रकरणात चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर 7 लोकांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाही करण्यात आली. यात घटनेच्या रात्री कर्तव्यावर असलेल्या दोन आधीपरिचारिकांना सेवामुक्त करण्यात आले आहे. ही सेवामुक्तीची कारवाई मागे घेण्यात यावी या मागणीसाठी आज भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आंदोलन करण्यात आले आहे.

सेवामुक्त करण्यात आलेल्या परिचारिकांचा काहीही दोष नसताना त्यांना सेवामुक्त करण्यात आलं आहे. तर शाशकीय कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे सरकारने सेवामुक्ती मागे घ्यावी व त्यांना पूर्ववत करण्यात यावे. या मागणीसाठी रुग्णालयातील नर्स लोकांनी आज शासनाचा निषेद करत आंदोलन केलं आहे, तर यातील जोती भारसकर ही नर्स त्या दिवशी हजर नसताना त्यांना रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळताच त्या रुग्णालयात येत सात मुलांना वाचविण्यात मदत केली. त्यांना देखील निलंबित करण्यात आले असून त्यांची देखील निलंबनाची कार्यवाही रद्द करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. जर लवकरात लवकर नर्सेसचा सेवामुक्त आदेश मागे घेतला नाही. तर पुढे राज्यव्यापी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नर्स आणि एनआरएचएमच्या संघटनांनी दिला आहे.

भंडारा आग दुर्घटना : डॉक्टरांवर झालेली कारवाई मान्य नाही, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, पालकांची मागणी

काय आहे प्रकरण?
भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात 9 जानेवारीला नवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एका डॉक्टरसह तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे तर तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आलं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या सर्वांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

भंडारा रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात आली होती.

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका, कुणावर काय कारवाई
डॉ प्रमोद खंडाते, सिव्हिल सर्जन - निलंबित
डॉ. सुनीता बडे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन- बदली
अर्चना मेश्राम, वैद्यकीय अधिकारी- निलंबित
सुशील अंबडे, बालरोग तज्ञ - सेवा समाप्त
ज्योती भारस्कार, नर्स इनचार्ज - निलंबित
स्मिता आंबीलडुके, स्टाफ नर्स - सेवा समाप्त
शुभांगी साठवणे, स्टाफ नर्स - सेवा समाप्त