मुंबई :  मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि निवडणूक आयोगावर (Election Commission)  काही गंभीर आरोप केले होते. ही पत्रकार परिषद आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलीय. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. आता आयोग अॅक्शन मोडवर आलंय.  भाजपचे कारस्थान असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मतं मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जाणूनबूजून मतदानाला वेळ लावला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता.  


उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.  भाजपच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला नेमकं त्यादिवशी पत्रकार परिषदेत काय झाले याची माहिती मागवली होती.  त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहेत.  


निवडणूक आयोग पुढे काय करणार?


राज्य निवडणूक आयोगाने भाषांतर करून  पाठवलेला पत्रकार परिषदेचा मसुदा केंद्रीय निवडणूक आयोग परत तपासून पाहणार आहे. पत्रकार परिषदेत काही वादग्रस्त आहे का? आचारसंहिता उल्लंघन झाले आहे का? या सगळ्याची तपासणी करुन  निवडणूक आयोग पुढील पाऊले उचलणार आहे. 


काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?


मुंबईचे मतदान गाजले ते त्याच्या भोंगळ कारभारामुळे...  सामान्य जनता, विरोधी पक्ष, कलाकार सगळ्यांनीच टीका केला होती.
मुंबईतील मतदारसंघातून संथ गतीने मतदान झाल्याच्या तसेच रांगेत अनेक तास ताटकळत अभे राहूनही अनेकजण मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव  ठाकरे  यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर  केले.  निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहे. आयोगाकडून पक्षपातीपणा करण्यात येत आहे. तसेच मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातोय. मतदारांनी मतदानाला उतरवू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता.


आशिष शेलारांनी  काय तक्रार केली?


उद्धव ठाकरेंनी  भाजपावर बिनबुडाचे आरोप करतानाच त्यांनी निवडणूक आयोगावरही आरोप केले आहेत. हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांनी  पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली आहे.   


हे ही वाचा :


नवीन सरकार येईपर्यंत आचारसंहिता कायम, दुष्काळग्रस्तांना मदत कशी करणार? राज्य सरकारपुढे प्रश्न