डोंबिवली : ऐन उन्हाळ्यात डोंबिवलीत 12 तास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. सकाळी 9 वाजेपासून डोंबिवली पूर्व राम नगर, तुकाराम नगर, म्हात्रे नगर, आयरे गाव या भागातील वीज पुरवठा 12 तास बत्ती गुल होती. महावितरणच्या केबलमध्ये बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा झाल्याचं महावितरणने म्हटलंय. अखेर हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर रात्री 9 वाजता डोंबिवलीतील वीजपुरवठा पूर्ववत झाला.
वीज पुरवठा खंडित झाल्याच फटका नऊ हजार ग्राहकांना बसला. नागरिकांनी महावितरणकडे तक्रारी केल्या .केबलमध्ये बिघाड झाल्याचे कारण महावितरणकडून सांगण्यात आले .मात्र सकाळी आठ वाजल्यापासून लाईट नसल्याने नागरिकांनी दुकानदारांनी संताप व्यक्त केला .सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा बिघाड दुरुस्त होणार असल्याचे महावितरणने सांगितले.
बीड जिल्ह्यात भारनियमन वाढलं
वाढलेल्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असताना महावितरणने बीड जिल्ह्यातील नागरिकांना भारनियमनाचा शॉक दिला आहे. विजेची वाढलेली मागणी आणि कोळशाचा तुटवडा यामुळे बीड जिल्ह्यात आपत्कालीन भारनियमन सुरु करण्यात आले आहे. आज रात्रीपासून बीड जिल्ह्यातील फिडरवर सहा ते आठ तासांचे चक्री भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, लोडशेडींगचे वेळापत्रक बाबत अद्याप नियोजन झालेले नाही. ज्या भागातील वसुली कमी त्या भागात अधिकचे लोडशेडींग असा फॉर्म्यूला महावितरणने ठरवला असल्याची माहिती आहे. उन्हाळा ऋतू सुरू झाला असून अशा परिस्थितीत विजेची मागणी वाढली आहे. येत्या काळात विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
Coal Crisis : राज्यावर वीज निर्मीतीचं मोठं संकट, कोळशाचा तुटवडा असल्याने राज्य लोड शेडिंगच्या दिशेने