नांदेड : IDBI बॅंकेतून शंकर नागरी बँकेच्या खात्यातून 14 कोटी रुपये जाण्याच्या घटनेला तीन दिवस उलटले. आता दरोड्याच्या घटनेची तपासणी करण्यासाठी मुंबई सायबर क्राईमची टीम येणार आहे.
नांदेड शहरातील वाजीराबाद येथील IDBI बँकेच्या चौदा कोटी रुपयाचा ऑनलाइन दरोडा प्रकरणाला तीन दिवस उलटले. तरीही ग्राहकांच्या पैशांविषयी IDBI आणि शंकर नागरी बँकेने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. हॅकरने IDBI बँकेतील शंकर नागरी बँकेच्या खात्यातील तब्बल 14 कोटीच्या रकमेवर RTGS द्वारे डल्ला मारण्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. परंतु अद्याप या घटनेत ना IDBI बँकेने ना शंकर नागरी बँकेने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे या दोन्ही बँकेतील खातेदारांची धाकधूक मात्र वाढली आहे.
या दरोड्याविषयी मुंबई येथील सायबर क्राईमची टीम येणार असून या विषयी आम्ही IDBI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना बोलणार असल्याची माहिती माजी आमदार तथा संचालक ओमप्रकाश पोकर्णा यांनी दिली आहे. तसेच बँकेच्या खात्यामधून गेलेली रक्कम ही दिल्ली, नोएडा येथील 289 बँक खात्यावर गेली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याच प्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्याबाहेरील बँकेच्या खात्यात पैसे जात असताना IDBI बँकेने त्याची तपासणी का केली नाही? असा प्रश्न उपस्थित करून या सर्व घटनेला IDBI बँकच जबाबदार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. परंतु या विषयी माध्यमांसमोर बोलण्यासाठी मात्र त्यांनी टाळले.
संबंधित बातम्या :