नांदेड : नांदेड शहरातील वाजीराबाद येथील बँकेत चौदा कोटी रुपयाचा ऑनलाइन दरोडा पडला आहे. या प्रकरणात हॅकरने IDBI बँकेतील शंकर नागरी बँकेच्या खात्यातील तब्बल 14 च्या रकमेवर RTGS द्वारे डल्ला मारण्याची घटना घडली.


यामध्ये नांदेड शहरातील IDBI बँकेच्या खात्यातून अनेक नावाने खाते उघडुन खात्यातील 5 लाखाच्या आत रक्कम काढली आणि महत्वाचे म्हणजे सर्व रक्कम ही RTGS आणि NEFT ने काढली गेल्याचे समजतय. या विषयी शंकर नागरी बँकेचे CEO व्ही.डी. राजे यांच्याशी बातचीत केली असता, हॅकरने बँकेच्या खात्यातील 14 कोटी रुपये NEFT व RTGS ने आपल्या खात्यावर वळवले असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ज्या बँकेत एवढा मोठा ऑनलाइन दरोडा पडलाय त्या विषयी IDBI बँकेचे शाखा व्यवस्थापक रुपेश कोडगिरे यांनी मात्र काहीही बोलण्यास नकार दिलाय.यात शिवाजीनगर पोलिसात शंकर नागरी बॅंकेकडून लेखी तक्रार देण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.


IDBI बँकेतुन शंकर नागरी बँकेचे खात्यातील रकमेविषयी शंकर नागरी बँकेची सावध भूमिका घेत हॅकरने पळवलेली 14 कोटी रुपयाची रक्कम IDBI बँकेने तात्काळ शंकर नागरी बँकेच्या खात्यात जमा न केल्यास IDBI बँकेला हायकोर्टात ओढू असा इशारा दिला आहे.


काल नांदेड शहरातील वाजीराबाद येथील बँकेत चौदा कोटी रुपयाचा ऑनलाइन दरोडा पडला होता. यात हॅकरने IDBI बँकेतील शंकर नागरी बँकेच्या खात्यातील तब्बल 14 कोटीच्या रकमेवर RTGS द्वारे डल्ला मारण्याची घटना घडली होती .


या विषयी IDBI बँकेचे शाखा व्यवस्थापक रुपेश कोडगिरे यांच्याशी बोलल्यानंतर या ऑनलाईन चोरी विषयी IDBI बँकेशी काही घेणे देणे नाही असे सांगून इतर काहीही बोलण्यास नकार दिला होता.


परंतु या घटने विषयी शंकर नागरी बँकेने सावध भूमिका घेतली असून आम्ही IDBI बँकेचे खातेदार असून रिजर्व बँकेच्या नियमानुसार आमच्या पैशाची सर्वस्वी जिम्मेदारी IDBI बँकेची आहे असे ठणकावून सांगितले.आणि ही जबाबदारी IDBI बँक झटकून टाकत असेल तर त्या विषयी आम्हाला हायकोर्टात जावे लागेल असा इशारा शंकर नागरी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी दिला आहे. या घटने विषयी शिवाजीनगर पोलिसात शंकर नागरी बॅंकेकडून लेखी तक्रार देण्यात आलीय मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाहीय.


इतका मोठा ऑनलाईन दरोडा बँकेत पडला असताना IDBI व शंकर नागरी या दोन्ही बँका याला आपण जबाबदार नसल्याचे बोलत आहेत. या प्रकरणात IDBI बँक ही पैशाच्या व्यवहाराविषयी शंकर नागरी बँकेला जबाबदार धरतेय कारण IDBI बँकेच्या म्हणण्यानुसार शंकर नागरी बँकेचे खाते जरी आमच्या बँकेत असले तरी सर्वर शंकर नागरी बँक हाताळत असते असे IDBI म्हणते. तर शंकर नागरी बँक या घटने विषयी सावध पवित्रा घेत रिजर्व बँकेच्या नियमानुसार IDBI बँकने आम्हाला भरपाई द्यावी व या अगोदर ही IDBI बँकेत अशा घटना घडल्या असून या घटनेस IDBI जबाबदार असल्याचे बोलत आहे.
त्यामुळे या फ्रॉड ची जबाबदारी कुणाची हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीत आहे.