नांदेड : नांदेड शहरातील वाजीराबाद येथील बँकेत 14 कोटी रुपयाचा ऑनलाइन दरोडा टाकला. या दरोड्यात हॅकरने IDBI बँकेतील शंकर नागरी बँकेच्या खात्यातील तब्बल 14 च्या रकमेवर RTGS द्वारे डल्ला मारण्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्हा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नांदेड शहरातील IDBI बँकेच्या खात्यातून अनेक नावाने खाते उघडून खात्यातील 5 लाखाच्या आतील रक्कम काढली. महत्वाचे म्हणजे सर्व रक्कम ही RTGS आणि NEFT ने काढली गेल्याचे माहिती समोर येत आहे.
या विषयी शंकर नागरी बँकेचे CEO व्ही.डी. राजे यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले, हॅकरने बँकेच्या खात्यातील 14 कोटी रुपये NEFT व RTGS ने आपल्या खात्यावर वळवले. परंतु ज्या बँकेत एवढा मोठा ऑनलाइन दरोडा पडलाय त्या विषयी IDBI बँकेचे शाखा व्यवस्थापक रुपेश कोडगिरे यांनी मात्र काहीही बोलण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात शिवाजीनगर पोलिसात शंकर नागरी बॅंकेकडून लेखी तक्रार देण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.